सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अजूनही काही लोक या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. त्याच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतरही परिवारातील लोक, फॅन्स आणि जवळचे लोक दु:खात आहेत. खासकरून त्याच्या परिवारातील लोक अजूनही त्याच्या निधनावर विश्वास ठेवू शकत नाहीयेत. आपल्या मामाची आठवण काढत भाची कात्यायनी आर्या राजपूतने त्याच्या नावाने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये कात्यायनीने तिच्या गुलशन मामा म्हणजे सुशांतची मनभरून आठवण केली आहे. तिने लिहिले की' 'गुलशन मामा माझं या जगात सर्वात जास्त तुझ्यावर प्रेम आहे. आधीही आणि आताही तूच माझ्यासाठी सर्वात अनमोल व्यक्ती आहे. मी नेहमीच विचार करतो की, कधी भविष्यात आपण आकाशाकडे बघून सत्याच्या रहस्यावर चर्चा करणार. आयुष्याबाबतच्या तुमच्या गोष्टी मला नेहमीच संम्मोहित करत होत्या आणि मला अधिक चांगलं बनण्यासाठी प्रेरणा देत होत्या. मी कधीही विचार केला नव्हता की, मला हा दिवस बघावा लागेल, जेव्हा मला तुमचा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाही'.
'लोक तुमच्याबाबत जे विचार करत होते माझ्यासाठी तुम्ही त्यापेक्षा जास्त होते. मी जो विचार करत त्यापेक्षा मोठे आहात तुम्ही, तुम्ही तुमच्यासाठी जेवढा विचार करत होते, त्यापेक्षा जास्त तुम्ही माझा विचार करत होते. तुम्ही आधीही आणि आताही एक अशी ऊर्जा आहात जी रोखली जाऊ शकत नाही. आणि अशी ऊर्जा जी ही दुनिया आपल्यात ठेवण्यात सक्षम नाही'.
'एकदा तुम्ही मला म्हणाले होते की, मुळात आपण कधीच मरत नसतो आणि आज मला तुमच्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आहे. पण प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत हे कठिण होत जात आहे. मला बस एका पॅरेलल यूनिव्हर्समध्ये जायचं आहे. जिथे गोष्टी चांगल्या असतील, चमकते तारे असतील आणि आम्ही सगळे तुमच्या इंटलेक्चुअल जोक्सवर हसत राहू'.
सुशांतच्या भाचीने तिच्या पोस्टमध्ये तिच्या मामावर प्रेम व्यक्त केलंय आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की, तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे. ती त्याला किती मिस करत आहे. आपल्या पोस्टमध्ये कात्यायनीने शेवटी लिहिले की, 'तुमचं रक्त माझ्या नसांमध्ये वाहतं आणि मी ते बेकार जाऊ देणार नाही. गुलशन मामा, मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहिन'.
सुशांतचा मृतदेह पाहून रिया चक्रवर्तीची उडाली होती घाबरगुंडी, या गोष्टीला घेवून मागितली होती माफी
प्रेम म्हणजे निव्वळ मूर्खपणा,आयुष्यभर एकटेच राहणे पसंत करेन,कॅमेरासमोर रियाने मांडले होते तिचे विचार