अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बरेच दिवस तणावाखाली होती. अंकिताला सुशांतला विसरणे कठीण झाले होते. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैनची एंट्री झाली. सध्या अंकिता विकीला डेट करते आहे.
विकी सुशांतला सुद्धा ओळखत होता हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. सुशांतला फक्त विकीला ओळखतंच नव्हता तर त्याच्यासोबत चांगलं बॉन्डिग शेअर करायचा. थ्रोबॅक फोटो याचाच पुरावा आहे. ज्यात सुशांत विकी जैनला गालावर किस करताना दिसतो आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने अंकिता लोखंडेला धक्का बसला होता. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिता मोहीमही राबवित आहे. सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ती करत आहेत.
अंकिता लोखंडेने आपल्या बर्याच मुलाखतींमध्ये असे म्हटले आहे की, सुशांत डिप्रेशनमध्ये असू शकत नाही. त्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचे होते. सुशांतने आत्महत्या करूच शकत नाही. असे असते तर त्याने कधीच केली असती. पवित्र रिश्ता ही मालिका सोडल्यानंतर तो तीन वर्षे घरी बसून होता. त्याच्याजवळ काहीच काम नव्हते. बॉलिवूडमध्ये तो स्ट्रगल करत होता. मी कामावर जायचे आणि तो एकटा घरी असायचा. नैराश्य आणि काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या करायची असती तर त्याने तेव्हाच केली असती, असेही अंकिता या मुलाखतीत म्हणाली.