सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर साऱ्या जगातील त्याचे फॅन्स त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत आहेत. त्याची बहीण श्वेताने तर ऑनलाइन ग्लोबल प्रार्थनाही केली आहे. ज्यात जगभरातील सुशांतच्या फॅन्सनी सहभाग घेतला होता. आता श्वेताने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय. या मुलाच्या प्रोफाइलवरून माहिती मिळते की, तो पोलॅंडचा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला धड हिंदीही बोलता येत नाही. पण त्याला सुशांतचं एक गाणं तोंडपाठ आहे.
श्वेता सिंह किर्तिने हा व्हिडीओ रिशेअर केला. याच्या कॅप्शनला त्याने लिहिले की, थॅंक यू आणि हॅशटॅग लिहिलाय. सीमांनी आपल्याला वेगळं केलंय आणि भावनांनी जोडलंय. या मुलाने सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याला हिंदी तर बोलता येत नाही, पण तो हिंदी गाणं गातो. त्याचं ट्विटर हॅंडल त्याचे वडील हॅंडल करतात. या मुलाने सुशांतचा सिनेमा 'राब्ता'तील लंबिया सी जुदाइंया' हे गाणं गायलंय.
दरम्यान, सुशांतचे जगभरातील फॅन्स त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम चालवत आहेत. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी सीबीआयच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. त्यांच्यासाठी यावर विश्वास ठेवण कठिण होतं की, त्यांचा लाडका स्टार आत्महत्या करू शकतो. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी फेसबुकवर अनेक फॅन पेज तयार केले गेले.
पाटण्यातील पोस्टर श्वेताने केलं शेअर
सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तिने या मुलाच्या व्हिडीओसोबतच पटणातील एक फोटो शेअर केला. इथे एका बिलबोर्डवर सुशांतसाठी न्याय मागणारं पोस्टर लावण्यात आलंय.
शोविकच्या अटकेनंतर श्वेताची पोस्ट
श्वेताने पोस्ट शेअर करताना लिहिले, देवा तुझे आभार, आम्हा सर्वांना सत्याच्या दिशेने मार्ग दाखवत रहा. श्वेताची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायर होते आहे. सुशांतचे फॅन्स यावर कमेंट करत आहेत.
चौकशीत शोविकने रियासोबत ड्रगसंबंधी केलेले चॅट खरे असल्याचे कबुल केले आहे. यामुळे शोविकच रियासाठी मोठी अडचण ठरला आहे. या चॅटमध्ये रिया कोणत्यातरी व्यक्तीसाठी शोविककडे ड्रग्ज मागत आहे. यामुळे शोविकच्या म्हणन्यानुसार रियालाही अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हे पण वाचा :
शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर सुशांतची बहिणीने दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..
VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'
भाऊ शोविकनंतर रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता; एनसीबी पाठवणार समन्स