सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे. सुशांत सिंग राजपूत या नात्याला एक पाऊल पुढे न्यायचं होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चेने जोर पकडला होता. मात्र या प्रकारणावर सुशांतने अखेर मौन तोडले आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या संदर्भातला प्रश्न जेव्हा सुशांतला विचारण्यात आला यावर तो हसून म्हणाला, ही निव्वळ अफवा आहे. सध्या मी याप्रकारच्या न्यूज वाचणं बंद केले आहे.
रियापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे रिलेशनशिप अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते. पण अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर सुशांत व क्रिती सॅननच्या रोमान्सच्या चर्चा रंगल्या. क्रितीमुळे सुशांत व अंकिताचे ब्रेकअप झाले, असेही म्हटले गेले. पण कालांतराने हे नातेही संपले. आता सुशांत रियाच्या प्रेमात वेडा झाला आहे. त्याचे हे नाते किती यशस्वी होते, ते पाहणे आता इंटरेस्टिंग असणार आहे.