बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला. पण सुशांतचे फॅन्स आणि फॅमिली या दु:खातून सावरलेले नाहीत. सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरू आहे. सर्वांना न्याय हवा आहे आणि अशात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहिण प्रियंका सिंग (Sushant Singh Rajput Sister Priyanka Singh) हिने भावाबद्दल मोठा दावा केला आहे. माझा भाऊ सुशांत आत्महत्या करूच शकत नाही,असं तिने म्हटलं आहे.इंडिया न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सुशांतची बहिण प्रियंकाने अनेक दावे केलेत.
काय म्हणाली प्रियंका? मी माझ्या भावाला चांगली ओळखते. तो कधीही आत्महत्या करु शकत नाही. मी स्वत: एक क्रिमिनल वकील आहे आणि त्या नात्याने सुशांतने आत्महत्या केलेली नाही, हे पाहताक्षणीच मला कळून चुकलं होतं. मी त्याच्या खोलीत पहिल्यांदा गेले, तेव्हा ती खोली, पंखा आणि पलंगाची उंची पाहूनच समजली होती की एवढ्या उंचीच्या आधारे तो आत्महत्या करु शकत नाही. त्याचा मृतदेह पाहताक्षणी मला शंका आली होती. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील वस्तू हलवण्यात आल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर त्याची उंची सुद्धा चुकीची सांगितली गेली होती. त्या दिवशी काय घडलं ते संपूर्ण जग पाहत होतं. त्या ठिकाणी जे पोलिस होते त्यांनी ते ठिकाण पिकनिक स्पॉट केला होतं. मी रात्री तिथे पोहोचलो, त्यावेळी तिथे पिवळ्या रंगाची टेप लावण्यात आली होती. ती काढण्यासाठी जवळपास 7 ते 9 दिवस लागले आणि तितके दिवस मी तिथेच होती. त्यानंतर जेव्हा तो दरवाजा उघडला, तेव्हा मुंबई पोलिसांनी मला तुम्ही आत जाऊ शकता असं सांगितलं होतं.
पहिल्यांदा मी त्याच्या खोलीत गेली. माझ्या भावाचं घर बदलेलं होतं. मी फौजदारी वकील आहे. मी अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत. फोटोदेखील पाहिले आहेत. एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याचे डोळे बाहेर येतात किंवा जीभ बाहेर येते. त्याच्या मृतदेहावरुन सर्व गोष्टी उघड होतात. मी त्या खोलीमध्ये गेल्यावर पंखा आणि बेडची उंची पाहिली. माझा भाऊ अशा ठिकाणी गळफास घेऊच शकत नाही, हे कळायला मला फार वेळ लागला नाही. मी पाहताक्षणीच सर्व समजले होते. ते म्हणत होते की तिथे कपडा पण होता. त्याची लांबी पाहून अंदाज घेतला जाऊ शकतो. बेड आणि पंख्यादरम्यान इतकीही हाईट नव्हती, जितकी सुशांतची होती. असं प्रियंका म्हणाली.
सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी कथितरित्या आत्महत्या केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरातील त्याच्या राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवडूच नव्हे, तर अख्या देश हादरला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर वेगवेगळे दावे केले गेले. तसेच त्यांची हत्या करण्यात आल्याचंही म्हटलं गेलं. प्रकरण तापल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.