Join us

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये नवा टर्न, 'या' गोष्टीमुळे वाढला सीबीआयचा संशय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 9:28 AM

सुशांतची बहीण मीतूने सुद्धा हे आधी सांगितलं होतं की, १४ जूनला सकाळी सुशांतने फोन उचलला नाही.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला याचा शोध सीबीआय वेगवेगळ्या अ‍ॅंंगलने घेत आहे. सुशांत १४ जूनला आपल्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृत आढळून आला होता. आता केसबाबत एक नवीन बाब समोर आली आहे. ही बाब काहीतरी गडबड असण्याकडे इशारा करत आहे. सीबीआयच्या सूत्रांनुसार, सुशांतने १३ जूनच्या दुपारपासूनच फोन आणि मेसेजला रिप्लाय दिला नाही. सुशांतची बहीण मीतूने सुद्धा हे आधी सांगितलं होतं की, १४ जूनला सकाळी सुशांतने फोन उचलला नाही.

१३ जूनला लवकर बंद झाले लाइट

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला ही बाब अजूनही रहस्य बनून आहे. टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, १३ जूनपासूनच सुशांत मेसेज, कॉल किंवा चॅटला उत्तर देत नव्हता. तसेच सुशांतच्या शेजाऱ्यांनी सांगितले होते की, १३ जूनला त्याच्या घरातील लाइट लवकर बंद केले गेले होते. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही त्याच्या मृत्यूचा वेळ नोंदवला नसल्याने यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

कुकच्या बोलण्यात आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फरक

सुशांतचा कुक नीरजने सांगितले की, मृत्यूच्या दिवशी सकाळी सुशांतला नारळाचं पाणी देण्यात आलं होत. पण लेटेस्ट पोस्टमार्टम रिपोर्टनुससार, सुशांतचं ब्लॅडर रिकामं होतं. असेही सांगितले जात आहे की, सुशांतचा टॅलेंट मॅनेजर त्याच्यासोबत १३ जूनला दुपारी २.२२ वाजता बोलला होता. तेच १४ जूनबाबत दीपेश सावंतने सांगितले होते की, त्याला शंका आली आणि तो १०.३० वाजतापासून ते १ वाजेपर्यंत सुशांतचा दरवाजा वाजवत होता. तसेच १०.३० वाजता दीपेशने जाहिरातीसंबंधी एका मॅटरविषयी एकाला मेसेज केला होता.

१७ सप्टेंबरला सीबीआय मेडिकल बोर्डमीटिंग

तेच सीबीआयने सुशांतच्या मृत्यूचा पत्ता लावण्यासाठ एम्सच्या मेडिकंल टीमची मदत घेतली. रिपोर्ट्सनुसार, १७ सप्टेंबरला महत्वाची मीटिंग झाली. दुसरीकडे एनसीबीने या केसमध्ये ड्रग्स अ‍ॅंगलने तपास करत आहे. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंतसहीत काही ड्रग पॅडलर्सना अटक झाली आहे.

सॅम्युअल मिरांडा ब्लॅकमेल करत होता?

दरम्यान, बीआयच्या संशयाची सुई सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिपकडे वळली आहे. सॅम्युअल हाओकिप सुशांतला ब्लॅकमेल करत असल्याची माहितीसमोर येते आहे. ही गोष्ट दोघांमध्ये झालेल्या चॅटमुळेसमोर आली आहे. 

रात्री 2 वाजता सुशांतचे घरातून बाहरे पडला सॅम्युअल 

सीबीआय चौकशी असे कळले की, सुशांतच्या आयुष्यात सॅम्युअल हाओकिपची एंट्री मित्र आणि कायदाशीर सल्लागार म्हणून झाली होती. सॅम्युअल हा कायदा तज्ञ आहे. सुशांतच्या फार्महाऊसचा कॉन्ट्रॅक्ट सॅम्युअलने तयार केले होते. पण असे मानले जाते की सुशांत आणि सॅम्युअलमधील संबंध बिघडले होते. याच कारणामुळे २०१९ ला रात्री दोनच्या आसपास सॅम्युअलने सुशांतच्या घरातून बाहेर पडला होता. एवढेच नाही तर सुशांतने एकदा सॅम्युअलचा फोनदेखील आपल्या ताब्यात घेतला होता. 

फोनमध्ये मिळाले मेसेजेस

सीबीआय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सॅम्युअल हाओकिपची सतत चौकशी करते आहे. त्याचे आणि सुशांतचे अनेक चॅट्स मिळाले आहेत ज्या वरुन तो ब्लॅकमेल करत असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप हे मेसेजेस काय आहेत याचा खुलासा सीबीआयने केला नाही. 

हे पण वाचा :

सुशांतच्या फार्महाउस पार्टीला रिया चक्रवर्ती शिवाय यायची ही अभिनेत्री; स्टिंग ऑपरेशनमध्ये झाला खुलासा

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

सुशांतला ब्लॅकमेल करत होता सॅम्युअल हाओकिप, रात्री 2 वाजता सोडले होते घर ?

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग