Join us

सुशांत सिंग राजपूतसोबतचे नातं गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जगापासून लपवायचं होते, 2 महिन्यांपूर्वी केली होती ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:48 IST

रिया चक्रवर्ती 2 महिन्यांपूर्वी सुशांत सिंग राजपूतबद्दल खोटे बोलली होती.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रोज नवे खुलासे होतायेत. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करतायते. सुशांतची  गर्लफ्रेंड रिया चक्रवतीने चौकशी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. बिहारमध्ये रिया चक्रवतीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दीर्घकाळापासून सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करतायेत. मात्र दोघांनी आपलं नातं कधीच अधिकृतरित्या स्वीकारले नाही. 

सुशांतच्या निधनाच्या दोन महिन्यांपूर्वी रियाने सुशांत सोबतच्या डेटिंगच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या तो फक्त माझा चांगला मित्र आहे असे ती म्हणाली होती. बॉलिवूड टाईम्सच्या रिपोर्टनुसार एक मुलाखती दरम्यान रिया म्हणाली की, मी आणि सुशांतने कधीच एकमेकांना डेट करतो आहे असे म्हटले नाही. आमच्या नात्याबद्दल ज्या बातम्या समोर येत आहेत त्या खोट्या आहेत. सुशांत सिंग राजपूत माझा खूप चांगले मित्र आहे. मी सुशांतला गेल्या 8 वर्षांपासून ओळखते. आम्ही दोघांनीही यशराज फिल्मसाठी काम केले आहे. मी माझ्या सर्व मित्रांवर खूप प्रेम करतो. त्यात लपण्यासारखे काहीच नाही.

चाहत्यांचा आरोप लावत आहेत की, रिया चक्रवर्तीने 2 महिन्यांपूर्वी सुशांत सिंग राजपूत बद्दल खोटे बोलली होती. पोलिस चौकशीत रियाने सुशांत सिंग राजपूतसोबतचे नातं स्वीकारले आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सुशांतसिंग राजपूतच्या निधनापूर्वी महेश भट्ट यांनी रियासोबतचे संबंध संपवण्याविषयी बोलले होते. त्यानंतर रियाने सुशांतसिंग राजपूतला सोडण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन असा अंदाज लावण्यात येतो आहे की, सुशांतच्या आत्महत्येच्या 2 महिन्यापूर्वीपासून दोघांच्या नात्यात मतभेद होण्याची सुरुवात झाली होती.

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती