Join us

टॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 16:26 IST

आत्महत्या करण्याच्या एकदिवस आधी सुशांत टॅलेंट मॅनेजर उदय सिंग गौरीशी फोनवर बोलला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनापासून त्याच्या मृत्यूबद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत. आत्महत्या करण्याच्या एकदिवस आधी सुशांत टॅलेंट मॅनेजर उदय सिंग गौरीशी फोनवर बोलला होता. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार उदय गौरीशी बोलताना सांगितले की, त्याने सुशांतशी काही नवीन प्रोजेक्टबाबत चर्चा केली होती.  

अलीकडेच, उदय गौरीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 13 जून रोजी मी सुशांतशी एका कॉन्फरन्स कॉलद्वारे संभाषण केले होते, त्या कॉन्फरन्स कॉलमध्ये चित्रपट निर्माते रमेश तौराणी आणि निखिल अडवाणी यांचादेखील समावेश होता. आम्ही काही नव्या प्रोजेक्ट्ससाठी सुशांतला कॉल केला होता ज्यात सुशांतनेही इंटरेस्ट दाखवला होता. या व्यतिरिक्त, उदयने हे देखील सांगितले की- 'सुशांत आमच्या संभाषणादरम्यान पूर्णपणे सामान्य होता आणि स्क्रिप्टबद्दल उत्साहित होता.

त्याच वेळी उदयला जेव्हा  सुशांतच्या आत्महत्येबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाले की- 'एक गोष्ट अशी असू शकते की सुशांत डिप्रेशनमध्ये असावा किंवा फिल्म इंडस्ट्रीमधून त्याला पूर्णपणे वेगळे केले असावे. 

रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सचीही देखील तपासणी करण्यात आली आहे. रियाने एक्स मॅनेजर श्रुती मोदीला अनेक फोन केले. श्रुती, सुशांतची एक्स मॅनेजर होती.  सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत