Join us

सुशांत सिंह राजपूतचं वडिलांसोबत नातं चांगलं नव्हतं, रियाचा हा दावा खोटा ठरवणारा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 12:41 PM

रियाने म्हणाली होती की, सुशांत साधारण ५ वर्षे वडिलांसोबत बोलला नव्हता. रियाच्या या दाव्यानंतर सुशांतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं कसं होतं हे दिसून येतं.

बॉलिवूड अभिनेता रिया चक्रवर्तीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सुशांत सिंह राजपूत केसबाबत अनेक दावे आणि खुलासे केले होते. मुलाखती दरम्यान रिया चक्रवर्ती म्हणाली होती की, सुशांत सिंह राजपूतचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं. पण सुशांतचे वडील केके सिंह यांच्यासोबत काही खास संबंध नव्हते. रियाने म्हणाली होती की, सुशांत साधारण ५ वर्षे वडिलांसोबत बोलला नव्हता. रियाच्या या दाव्यानंतर सुशांतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं कसं होतं हे दिसून येतं.

सुशांतच्या परिवाराने ट्विटरवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. ज्यात तो त्याच्या वडिलांबाबत बोलताना दिसत आहे. यात सुशांत वडिलांबाबत बोलतोय की, 'मी एक फार चांगली गोष्ट माझ्या वडिलांकडून शिकलो. जी नेहमीच माझ्या लक्षात असते. मी खूप काही आईकडून शिकलो, पण खूपकाही शिकू शकतो हे मी वडिलांकडून शिकलोय'. 

हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, 'कसं फसवणं, नशा करणं, उद्ध्वस्त करणं आणि एका उच्च मूल्य असलेल्या व्यक्तीला मारणं आणि त्याच्यासोबत पळून जाणं? न्यायासाठी लोकांना बदनाम करणं, खोटं बोलणं, तथ्य बदलणं आणि कायद्याचं पालन करण्यासाठी कायदेशीर सुरक्षेचं शोषण करणं! हे तिने लक्षात घ्यायला पाहिजे की, ही गुन्हेगारांची न्याय व्यवस्था नाहीये'.

याआधीही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची वहिणी नूतन सिंहने आपल्या ट्विटर अकाऊंट माध्यमातून दावा केला होता की, सुशांतचं त्यांच्यासोबत चांगलं नातं होतं. सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सीबीआय तपास करत आहे आणि हत्येबाबत यात आतापर्यंत सीबीआयला कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. 

हे पण वाचा :

अखेर रिया चक्रवर्तीने CBI समोर महेश भट यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तोडली चुप्पी

सुशांत सिंह राजपूतच्या फॅमिलीवर लीगल अ‍ॅक्शन घेऊ शकते रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्तीने का केले सुशांतची बहीण प्रियंकाला टार्गेट?, गणेशने केला धक्कादायक खुलासा

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती