सुशांत सिंग रजपूतचे निधन 14 जानेवारी 2020 ला झाले. त्याच्या निधनाने त्याच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला. त्याच्या निधनाला आता एक वर्षं पूर्ण होतील. त्याची अखेरची इच्छा अपुरी राहिली असल्याचा खुलासा प्रतीक बब्बरने एका मुलाखतीत नुकताच केला आहे.
प्रतीक आणि सुशांतने छिछोरे या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची खूपच चांगली मैत्री झाली होती. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने सांगितले की, सुशांत आणि माझी भेट एखाद्या इव्हेंटमध्ये वगैरे झाली होती. पण छिछोरे या चित्रपटामुळे आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स झालो. त्याला चंद्र, तारे याबद्दल प्रचंड आकर्षण होतं. त्याला अंटार्क्टिकेला जायचं होतं. छिछोरे या चित्रपटानंतर मी तिथे जाईन असे त्याने मला त्यावेळी सांगितले होते.
काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री मारणाऱ्या सुशांतने अनेक हिट चित्रपट दिले. ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे भरपूर कौतुक झाले. पण, वयाच्या 34व्या वर्षी त्याने जग सोडल्याच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्याने केदारनाथ, छिछोरे यांसारख्या अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या.