Join us

सुशांतसिंग राजपूतची स्वप्नं आणि विचार राहणार कायम, नवी वेबसाईट लाँच करून त्याच्या टीमची अनोखी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 4:48 PM

सुशांत 2003 मध्य दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता

सुशांत सिंगच्या निधनानंतर त्याच्या टीमने सेल्फ म्युझिंग डॉट कॉम ही वेबसाईट लाँच केली आहे. सुशांत सिंगच्या स्मरणार्थ ही वेबसाइट तयार केली गेली आहे. सुशांतच्या टीमने खुलासा केला की, सेल्फ म्युझिंग हे त्याचे स्वप्न होते. सुशांतच्या अधिकृत फेसबुक पेजवर वेबसाईटची लिंक शेअर करण्यात आली आहे. यात टीमने लिहिले की, त्याला एक अशी जागा तयार करायची होती, जिथे त्याचे प्रेक्षक त्याच्या मनात कायम राहिले. तो त्याच्या चाहत्यांना गॉडफादर म्हणत असे.

टीमने सुशांत सिंग राजपूतच्या फेसबुक पेजवरुन त्याच्या वेबसाईटची माहिती दिली आहे, 'जरी तो आपल्यातून निघून गेला असेल, परंतु तो अजूनही आपल्यात जिवंत आहे. त्याच्या सेल्फ म्युझिंग  https://selfmusing.com/ ची सुरुवात केली आहे. आपल्यासारखे चाहते सुशांतचे खरे गॉडफादर होते. सुशांत मागे सोडून गेली त्याची सगळी सत्कारात्मक ऊर्जा आम्ही इथं ठेवतो आहे. सुशांतच्या सगळ्या आठवणी या वेबसाईटवर एकत्र करण्यात आल्या आहेत. 

सुशांत 2003 मध्य दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता.इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेतल्या परीक्षेत सुशांत संपूर्ण भारतात सातवा आला होता. यानंतर सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग (आता दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी) मधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केला. मात्र इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात त्याने शिक्षण सोडून अभिनय सुरु केला.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत