सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ का नाही ? फॅमिली वकीलाचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:08 PM2020-08-16T12:08:11+5:302020-08-16T12:08:35+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली, असे मुंबई पोलिस म्हणत आहेत. दुसरीकडे सुशांतचे कुटुंबीय त्याने आत्महत्या केली हे मानायला तयार नाहीत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली, असे मुंबई पोलिस म्हणत आहेत. दुसरीकडे सुशांतचे कुटुंबीय त्याने आत्महत्या केली हे मानायला तयार नाहीत. आता सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरून सुशांतच्याफॅमिली लॉयरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, सुशांतचे वडिल के. के. सिंग यांचे वकील विकास सिंग यांनी पोस्टमार्टम रिपोर्टवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुशांतचा पोस्टमार्टमरिपोर्ट मी पाहिला आहे. मात्र या रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचीच वेळ नाही. मृत्यूच्या वेळेचा उल्लेख ही पोस्टमार्टम रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती असते. सुशांतला फाशी देण्यात आली की फासावर लटकवण्याआधी त्याला मारण्यात आले, हे त्याच्या मृत्यूच्या वेळेवरून स्पष्ट होऊ शकले असते, असे विकास सिंग यांनी म्हटले आहे. यापूर्वी विकास सिंग सुशांतच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली होती. कोणीही सुशांतला लटकलेल्या अवस्थेत पाहिले नाही. त्याची बहीण घटनास्थळी पोहोचली तेव्हा सुशांतचा मृतदेह बेडवर होता. हे सगळे विचित्र आहे, असे ते म्हणाले होते.
The post mortem report that I have seen doesn't mention the time of death which is a crucial detail. Whether he was hanged after being killed or he died by hanging can be cleared with the time of death: Vikas Singh, lawyer of #SushantSinghRajput's father pic.twitter.com/XBoMyJb7ih
— ANI (@ANI) August 15, 2020
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुशांतच्या शरीरावर कोणताही संघर्ष किंवा दुखापतींच्या खुणा सापडलेल्या नाहीत. सुशांतच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.
सुशांत मृत्यूप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात बिहार पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. तपासावरून बिहार पोलिस व मुंबई पोलिस यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले होते. एवढेच नव्हे तर बिहार सरकार व महाराष्ट्र सरकारही आमनेसामने आल्याचे चित्र बघायला मिळाले होते.