Join us

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांनी फ्लॅटमेट्सवर केले गंभीर आरोप, त्याच्या निधनानंतर सगळे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 5:40 PM

सुशांतच्या कुटुंबियांनी आता त्याच्या फ्लॅटमेट्सवर गंभीर आरोप केले आहेत.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआय या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चौकशी करत आहे. या प्रकरणी आता सुशांतच्या कुटुंबियांनी आता त्याच्या फ्लॅटमेट्सवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या कुटुंबियांशी निगडीत सूत्रांनी दावा केला आहे की ज्या दिवशी सुशांतचे निधन झाले होते. त्यानंतर त्याचे फ्लॅटमेट्स किचनमध्ये जेवण बनवत होते. 

टाइम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, सुशांतच्या कुटुंबियांच्या निगडीत काही सूत्रांनी सांगितले की 14 जून रोजी सुशांतच्या निधनानंतर जेव्हा त्याची फॅमिली रात्री त्याच्या फ्लॅटवर पोहचले होते त्यावेळी घरातील सगळे खूप नॉर्मल वाटत होते. रिपोर्टनुसार, सुशांतचे फ्लॅटमेट्स रात्री किचनमध्ये जेवण बनवत होते जसे काही घडलेच नाही.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या निधनानंतर काही तासात घरातील चारही जण सामान्य कसे वागू शकतात. कदाचित त्यासाठी सीबीआय सातत्याने मागील पाच दिवसांपासून कुक नीरज आणि सिद्धार्थ पिठानीसोबत चौकशी करत आहेत. याशिवाय सीबीआय सुशांतचा स्टाफ दीपेश सावंत व केशवसोबतही चौकशी करत आहेत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने नुकतीच सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. सिद्धार्थने सीबीआयच्या समोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थने सांगितले की 8 जूनला सुशांतचे घर सोडून गेली होती रिया. सकाळी 11.30 च्या सुमारास रियाने बॅक भरून निघाली होती. रियाने सिद्धार्थला सुशांतची काळजी घ्यायला सांगितली. त्यावेळी सुशांतने रियाला मिठी मारुन बाय म्हणाला होता.

सिद्धार्थने सांगितले की, 14 जून रोजी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान मी हॉलमध्ये माझे काम करत होतो आणि 10.30च्या दरम्यान केशवने मला सांगितले की सुशांत सर दरवाजा खोलत नाही आहेत. मी दिपेशला बोलवले. आम्ही दोघांनी दरवाजा वाजवला पण सुशांतने दरवाजा नाही खोलला. तेव्हा मला मीतू दीदीचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी सुशांतला कॉल केला पण त्याने फोन उचलला नाही. तेव्हा आम्ही सांगितले की आम्ही पण प्रयत्न करतोय पण तो दरवाजा खोलत नाही आहे. मी मीतू दीदीला घरी बोलवले.

मी वॉचमेनला सांगून चावीवाल्याला बोलवायला सांगितले पण वॉचमेन मदत करू शकला नाही. मग मी गुगलवरून रफीक चावीवाल्याचा नंबर शोधला आणि दुपारी 1.06 मिनिटांनी कॉल केला. त्याने माझ्याकडे 2000 रुपये मागितले. रफीकच्या सांगण्यानुसार त्याला मी लॉकचा फोटो व घराचा पत्ता पाठवला. दुपारी 1.20 मिनिचांनी रफीक आपल्या साथीदारासोबत आला. त्याने लॉक पाहून चावी बनणार नाही असे सांगितले. त्यावर मी त्याला लॉक तोडायला सांगितले. त्याने लॉक तोडले आणि त्याला पैसे दिले आणि जायला सांगितले. मग मी आणि दीपेश खोलीत गेलो. तिथे खूप अंधार होता. लाइट लावली तेव्हा आम्ही सुशांतला हिरव्या रंगाच्या कपड्याने पंख्याला गळफास लावून लटकला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग