Join us

Rhea Chakraborty च्या मुलाखतीवर बोलला सुशांतचा खास मित्र महेश शेट्टी, व्हायरल झाली त्याची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 11:38 AM

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सुशांतच्या डिप्रेशनबाबत वक्तव्य केलं होतं. रिया मुलाखतीत म्हणाली होती की, सुशांत आणि त्याच्या वडिलांचं नातं ठिक नव्हतं.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आणि टीव्ही अभिनेता महेश शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यांबाबत लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सुशांतच्या डिप्रेशनबाबत वक्तव्य केलं होतं. रिया मुलाखतीत म्हणाली होती की, सुशांत आणि त्याच्या वडिलांचं नातं ठिक नव्हतं.

रियाच्या या मुलाखतीनंतर महेश शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपलं मत मांडलं होतं. रियाच्या मुलाखतीवर त्याने मनमोकळेपणाने आपलं म्हणणं मांडलं. त्याने लिहिले की, 'हे जे लोक आहेत, ते त्यांचा बचाव करू शकतात. पण शेवटी सत्याचा विजय होईल. यात सर्वात आपला सन्मान गमावू नका आणि जो गेला आहे त्याला बदनाम करू नका'. सुशांतने आत्महत्या करण्याआधी महेश शेट्टी यालाच शेवटचा कॉल केला होता.

सुशांतच्या आत्महत्येनंतर महेश शेट्टीने एका पोस्टमध्ये लिहिले होते की, 'ही फारच विचित्र फिलिंग आहे. मला खूप काही बोलायचं आहे. पण बोलू शकत नाहीय. आपल्या जीवनात अनेकदा आपण अशा काही लोकांना भेटतो. ज्यांच्याशी जबरदस्त कनेक्शन जुळतं. असं जाणवतं की, त्याच्याससोबत तुमचं आधीपासून काहीतरी नातं आहे. भाऊ होण्यासाठी एकाच आईच्या पोटातून जन्म घेण्याची गरज नाही. सुशांत आणि मी असेच भाऊ होतो. सुशांत फार परफेक्शनिस्ट होता. मी सुशांतचा प्रत्येक सिनेमा बघत होतो आणि फार आनंदी होत होतो. तो त्याची भूमिका चोखपणे साकारत होता आणि त्यासाठी तो फार मेहनतही घेत होता. त्याला बघून आम्हाला फार गर्व वाटत होता'.

हे पण वाचा :

सुशांत अचानक रडायचा, घाबरायचा...! उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले धक्कादायक खुलासे

सुशांतचा मृत्यू झाल्या दिवसापासून घरातील ही महत्त्वाची वस्तू अचानक झाली गायब, कुटुंबीयांचा CBI समोर खुलासा

रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे!

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतटेलिव्हिजन