सुशांत सिंग राजपूतचा मित्र आणि निर्माता संदीप सिंगने बदनामीकारक वृत्तांकन केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही आणि या चॅनलचे अर्णब गोस्वामी यांना कायदेशीर नोटीस पाठवत 200 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. संदीपने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे.
‘ही परतफेडीची वेळ आहे,’ असे ही पोस्ट शेअर करताना संदीप सिंगने लिहिले आहे. संदीप सिंगच्या वकीलाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये लिहिले आहे, ‘संदीप सिंग एक नामवंत दिग्दर्शक व निर्माते आहेत. ज्यांच्याबद्दल गुन्हेगारीवृत्तीने चुकीच्या बातम्या दिल्या गेल्यात. सुशांत व संदीप स्ट्रगलिंग काळापासून चांगले मित्र आहेत, हे माहित असतानाही बेजबाबदार बातम्या प्रसारित केल्या गेल्यात.’ चुकीच्या बातम्या, व्हिडीओ, फुटेज व लिखीत गोष्टी त्वरित हटवाव्यात आणि माफी मागावी. शिवाय प्रतिमा खराब केल्याबद्दल 200 कोटींची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही या नोटीसमध्ये करण्यता आली आहे.
सुशांत प्रकरणी ED पुन्हा अॅक्शन मोडमध्ये, दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या घरावर छापा
‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली...’; तपास यंत्रणांवर भडकले शेखर सुमन!!