सुशात सिंग राजपूतने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अकाली जाण्याने बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करत सुशांतने फार कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली होती. अनेक स्वप्नही पाहिली होती. ही स्वप्न पूर्ण करण्याआधीच सुशांतने अकाली एक्झिट घेतली.
सुशांत सिंह राजपूतने आपल्या या स्वप्नांची यादी बनवून ठेवली होती.2019 मध्ये सुशांतने चाहत्यांसोबत त्याच्या 50 स्वप्नांची यादी शेअर केली होती. त्याची ही यादी बघून सुशांत किती महत्त्वाकांक्षी होता, हे कळते़ सोशल मीडियावर तो प्रचंड अॅक्टिव्ह होता.
My 50 dreams & counting! सुशांतने पाहिलेल्या स्वप्नांची यादी
My 50 DREAMS & counting... अशा शीर्षकाखाली सुशांतने सोशल मीडियावर त्याच्या 50 स्वप्नांची यादी शेअर केली होती.
1. विमान उडवायला शिकणे2. आयर्न मॅन ट्रिथॉनसाठी (स्विमींग, सायकलिंग व रनिंग)चे ट्रेनिंग3. डाव्या हाताने क्रिकेट खेळणे4. मोर्स कोड शिकणे (टेलिकम्युनिकेशनची भाषा)5. अंतराळाबद्दल शिकण्यात मुलांना मदत करणे6. चॅम्पियनसोबत टेनिस खेळणे7. फोर क्लॅप्स पुश अप
8. एक आठवड्यापर्यंत चंद्र, मंगळ, गुरु, शनि या ग्रहांना त्यांच्या कक्षेत फिरतांना मॉनिटर करणे9. ब्लू होलमध्ये डुबकी मारणे10. डबल स्लिट एक्सपेरिमेंट एकदा पाहणे11. 1000 झाडे लावणे12. दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये एक संध्याकाळ 13. 100 मुलांना इस्रोमध्ये वर्कशॉपसाठी पाठवणे14. कैलाश पर्वतावर ध्यान
15. चॅम्पियनसोबत पोकर खेळणे16. पुस्तक लिहिणे17. सर्नच्या लॅबला भेट देण 18. ध्रुवीय प्रकाशाचं चित्र काढणे19. नासाचे आणखी एका वर्कशॉपमध्ये सहभागी होणे20. सहा महिन्यांत 6 पॅक्ड अब्स्ज21. सेनोटेसमध्ये पोहणे22. दृष्टिहिनांसाठीची कोड लँग्वेज शिकणे23. जंगलात एक आठवडा घालवणे24. वैदिक ज्योतिष्यशास्त्र शिकणे25. डिस्ज्नीलँड पाहणे
26. लिगोची लॅब पाहणे 27. एक घोडा पाळणे28.10 डान्स फॉर्म शिकणे29. फ्री एज्युकेशनसाठी काम करणे30. पॉवरफुल टेलिस्कोपमधून एंड्रोमेडा गॅलेक्सीला न्याहाळणे31. क्रिया योगा शिकणे32. अंटार्क्टिका खंड फिरायला जाणे33. महिलांना सेल्फ डिफेन्स शिकवणे34. जिवंत ज्वालामुखीत शूटींग करणे
35. शेती करणे36. मुलांना डान्स शिकवणे37. दोन्ही हातांनी एक समान धनुर्विद्या शिकणे38. रेसनिक हेलिडेची फिजिक्सवरची सगळी पुस्तके वाचणे39. पॉलिनेसियन अॅस्ट्रोनॉमी शिकणे40. गिटारवर50 आवडती गाणी शिकणे41. चॅम्पियनसोबत चेस खेळणे42. स्वत:ची लॅम्बर्गिनी खरेदी करणे
43. व्हिएन्नामधील सेंट स्टिफन कॅथेड्रेलला भेट44. व्हिजिबल साऊंड व व्हायब्रेशनचा प्रयोग करणे 45. इंडियन डिफेन्स फोर्ससाठी मुलांना तयार करणे46. विवेकानंदांवर डॉक्युमेंट्री बनवणे47. सर्फ लर्निंग48. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर काम करणे49. ब्राझिलचा डान्स व मार्शल आर्ट शिकणे50. ट्रेनमध्ये बसून युरोपचा प्रवास करणे