Join us

सुशांतची 'आठवण' म्हणजे त्याचा प्रेमळ डॉगी स्कॉच! आता त्यानेही सोडली अंकिताची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 19:02 IST

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नुकतीच रिएलिटी शो 'बिग बॉस १७'(Bigg Boss 17)मधून बाहेर पडली आहे. शोमध्ये ती टॉप ३मध्ये तिची जागा बनवू शकली नाही. दरम्यान आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा डॉगी स्कॉचचं निधन झाले आहे.

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री अंकिता लोखंडे  (Ankita Lokhande) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा पाळीव कुत्रा स्कॉचचं निधन झालं आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी शेअर केली आहे. स्कॉच अंकिता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)चा पहिला डॉग होता. त्यांच्या ब्रेकअपनंतर तो अंकितासोबत राहत होता.

अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर स्कॉचचा फोटो शेअर केला आहे आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, हॅलो बडी, मम्माला तुझी खूप आठवण येईल. रेस्ट इन पीस स्कॉच. 

स्कॉचचं इंस्टाग्राम अकाउंटस्कॉचच्या नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्यात सुशांत आणि अंकितासोबतचे बरेच फोटो आहेत. काही फोटोत सुशांत त्याचे लाड करताना दिसतो आणि तर काहीमध्ये खेळताना.

अंकिताने शेअर केला होता इमोशनल व्हिडीओअंकिताने स्कॉचचे लाड करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, जेव्हा कोणी तिच्यासोबत नव्हते तेव्हा स्कॉचने तिची साथ दिली.   

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतबिग बॉस