Join us

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने शेअर केले त्याच्या आत्महत्येच्या चार दिवसांपूर्वीचे चॅट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 5:04 PM

सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग किर्तीने भाऊ सुशांत सिंग राजपूतसोबतच्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा दिला.

सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग किर्तीने भाऊ सुशांत सिंग राजपूतसोबतच्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा दिला. दोघांच्या वयातील अंतरही फार कमी होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप चांगले बॉण्डिंग होते. श्वेताने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यातील एक फोटो सुशांतच्या बालपणीचा आहे तर दुसरा तिच्या लग्नात तिच्या शेजारी सुशांत उभा आहे. यासोबतच श्वेताने सुशांतसोबतचे 10 जून रोजी केलेल्या चॅटचे स्क्रीनशॉटदेखील शेअर केले आहे.

श्वेता सिंग किर्तीने चॅट शेअर केले आहे त्यात ती सुशांतला तिच्या इथे बोलवत होती. त्यावर सुशांतनेदेखील तिथे यायचे मन करत असल्याचे सांगितले होते.

श्वेताने या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या कुटुंबात नेहमीच सांगितले जाते की माझ्या आई वडिलांना एक मुलगा हवा होता. कारण आईला पहिला मुलगा झाला होता जो दीड वर्षांचा असताना हे जग सोडून गेला. अशात पहिल्या भावाला कधी भेटू शकली नाही. त्यामुळे माझे आई वडील दुसरा मुलगा होण्याची आशा करत होते. त्यासाठी त्यांनी नवस केला आणि सुरूवातील दोन वर्षे देवी भगवतीची पूजा केली. व्रत, हवन केले, धार्मिक ठिकाणी गेले, धार्मिक लोकांना भेटले. मग माझा जन्म झाला दिवाळीच्या दिवशी. माझ्या आईने मला लकी मानले आणि मला लक्ष्मी बोलली. बरीच प्रार्थना केल्यानंतर माझ्यापेक्षा लहान भाऊ जन्माला आला. जो सुरूवातीपासून खूप सुंदर होता. ज्याचे डोळे व स्माइल सर्वांना आकर्षित करत होती.

आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये श्वेताने सांगितले की कसे सुशांतने तिच्या घराजवळ घर घेतले होते. याशिवाय बऱ्याच गोष्टी तिने सांगितल्या आहेत.

सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत