सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला रोज एक नवं वळण येते आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या वडिलांचे वकील यांनी दावा केला आहे की, 'सुशांतवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला ड्रग्स दिले असतील. सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी बुधवारी सांगितले की, सुशांतच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याच्या नकळत त्याला ड्रग्स दिले असावेत.
सुशांत सिंग राजपूत तसेच या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती व तिचे संबंधित सर्वांचे फोन डिटेल्स तपास पथकाने मिळविल्यांतर आर्या याचे नावही आता चर्चेत आले आहे. सीबीआय, ईडी आणि आता NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंग आणि रिया यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा NCB चे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे.