Join us

प्रोडक्शन हाउसच्या कॉन्ट्रॅक्टमधील जाचक अटींमुळे त्रस्त होता सुशांत, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 7:34 PM

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर पोलीस चौकशीत एकानंतर एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या वृत्तेने सर्वांना धक्का बसला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने पोलिसांना चौकशीत सांगितले की, एका प्रमुख फिल्म प्रोडक्शन हाउससोबत केलेल्या करारांतील अटींमुळे नाराज होते. 

पोलिसांनी रिया चक्रवर्तीसोबत जवळपास 9 तास चौकशी केली. यादरम्यान रियाने पोलिसांना सांगितले की त्याच्याकडे तीन सिनेमांचे कॉन्ट्रॅक्ट होते. 2012 साली त्याला एका दुसऱ्या नामांकित निर्मात्यांकडून चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र करारबद्ध प्रोडक्शन हाउसने त्याला तो चित्रपट स्वीकारण्यास दिला नाही. त्यामुळे नाराज झाला होता.   

रियाने पोलिसांना सांगितले की तिची 2013 साली सुशांतसोबत भेट झाली. त्यावेळी ती मेरे डॅड की मारूती चित्रपटात काम करत होती. त्यावेळी सुशांत शुद्ध देसी रोमांस चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यादरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. कित्येक पार्टी व इव्हेंटमध्ये ते एकत्र गेले. 2017-18 साली ते रिलेशनशीपमध्ये आले. यापूर्वी सुशांत दुसऱ्या कोणासोबत रिलेशनशीपमध्ये होते. 

रियाने सांगितले की, नेहमीच कोणत्या तरी कारणामुळे त्रस्त होता. पण याबद्दल तो कोणालाच सांगत नव्हता. तो जास्त त्रस्त झाला की पुण्यातील फार्महाउसवर जायचा. 6 जूनला सुशांतने रियाला घरातून निघून जायला सांगितले होते.

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती