सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा सीबीआय तपास करा, अशी मागणी खुद्द सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीने केली आणि सगळेच हैराण झालेत. सुशांतने इतके मोठे पाऊल उचलण्यामागे काय कारण होते, त्याच्यावर कोणता दबाव होता, हे मला जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत तिने थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाच विनंती केली.
सुशांतला न्याय मिळावा यासाठी आपण सीबीआय चौकशीचा आदेश घ्यावा, अशी हात जोडून विनंती आहे, अशी पोस्ट रियाने लिहिली. तिची पोस्ट क्षणात व्हायरलही झाली. पण अचानक रियाने स्वत: ही पोस्ट लिहिली नसून तिचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा रंगली. अनेक नेटक-यांनी याकडे लक्ष वेधले.
हॅक झाले रियाचे सोशल अकाऊंट?सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारी रिया चक्रवर्तीची पोस्ट व्हायरल तर झाली पण ही पोस्ट तिने स्वत:च लिहिली की नाही, याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली.
एका युजरने तिच्या या पोस्टमधील चुकांकडे लक्ष वेधले. ‘कदाचित रियाचे ट्विटर हँडल हॅक झाले असावे. कारण तिच्या ट्विटमध्ये विचित्र चुका आहे. नावाचे पहिले अक्षरही स्मॉल लेटरमध्ये आहे,’असे एका युजरने लिहिले.
अन्य एका युजरनेही अशी शंका व्यक्त केली. ‘एक तर रियाचे अकाऊंट हॅक झालेय वा ती पोस्ट दुस-याच कोणी लिहिलेय. सुशांत सिंग राजपूतचे नावच ट्विटमध्ये चुकीचे लिहिले गेलेय. एका चांगल्या व्यक्तिचा असा अपमान योग्य नाही,’ असे या युजरने लिहिले. यानंतर सोशल मीडियावर रियाच्या या पोस्टवरून अनेक तर्कवितर्क काढले गेलेत.
काय होती रियाची पोस्ट?
आदरणीय अमित शाह सर,मी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. सुशांत सिंगच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. पण न्याय मिळावा यासाठी आपण सीबीआय चौकशीचा आदेश द्यावा अशी हात जोडून विनंती आहे. हे पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचेआहे, अशी पोस्ट रियाने केली होती. रियाने आपल्य ट्विटमध्ये सत्यमेव जयते हॅशटॅगही वापरला होती.