बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर दर दिवशी नवीन खुलासे होत आहेत. सुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असाही आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला होता. तिच्यावर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आला असा खळबळजनक आरोप केला. या प्रकरणातील सत्यसमोर यायला नको म्हणून सुशांतची हत्या करण्यात आली. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार सुशांत सिंग राजपूत पत्रकार परिषद घेऊन दिशाच्या मृत्यूविषयी सत्य सांगणार होता.
रिपोर्टनुसार सुशांतच्या एका मित्राने खुलासा केला की, सुशांतला दिशा सालियनयनच्या मृत्यूचे सत्य माहित होते आणि तो पत्रकार परिषदेत ते उघड करणार होते. सुशांतच्या मित्राने सांगितले की 9 जून रोजी सुशांतशी तिची चर्चा झाली. यादरम्यान सुशांतने पत्रकार परिषदेत दिशाच्या मृत्यूचे सत्य सांगेन असे म्हटले होते. दिशाने मृत्यूच्या आधी त्याला फोनवरुन सांगितले होते ते सुशांतला सांगायचे होते. त्याला दिशाला न्याय मिळवून द्यायचा होता. ही बातमी उघडकीस आल्यानंतर आता असे सांगितले जात आहे की सत्य जगासमोर येऊन, त्यामुळे सुशांतला ठार मारण्यात आले.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.