मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयाने सीबीआयला अहवाल सोपविला आहे. या अहवालाच्या आधारे याप्रकरणी आता सीबीआय पुढील तपास करणार आहे. तसेच, सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? यावरून सीबीआय निष्कर्ष काढणार आहे.
याप्रकरणी आता एम्सच्या अहवालानंतर सीबीआय अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एम्सने सुशांतचा ऑटोप्सी व व्हिसेराचा तपास अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआय या अहवालाची इतर पुराव्यांशी तुलना करेल. तसेच, या अहवालाच्या आधारे सीबीआय आपला पुढील तपास करणार आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे राहिले नाही, असा आरोप सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र, आता आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील.
या प्रकरणाचा तपास सर्व बाजूने करण्यात येत आहे. तसेच, सुशांतच्या मृत्यूची व्यावसायिक पद्धतीने चौकशी केली जात आहे. सर्व बाबींचा बारकाईने तपास केला जात आहे, असे सीबीआयने म्हटले आहे. याशिवाय, याप्रकरणी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याची बहिणींची चौकशी सीबीआय करू शकते.
विकास सिंह काय म्हणाले ?सुरवातीला ज्या वेगाने या प्रकरणाची चौकशी केली गेली त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी थंडावली आहे. या प्रकरणात जशी दिरंगाई होतेय तसे पुरावे संपत चालले आहेत. लवकरच या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली पाहिजे, असं विकास सिंह म्हणाले. अभिनेता सुशांतसिंह १४ जूनला वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.
आणखी बातम्या...
- WhatsApp चॅट्स लीक होतायेत, मग 'या' सोप्या पद्धती वापरून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता
- सुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर वाचा कोरोना संबंधित सर्व राज्यांचे नियम