सुशांतची बहीण श्वेता सिंगने सोशल मीडियावर 'जस्टीस फॉर सुशांत' ऑनलाईन कॅम्पेन सुरू केले होते. यामाध्यमातून ती सतत सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी झटत होती. सुशांतच्या निधनाला चार महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. आजही कुटुंबिय आणि चाहते त्या दुःखातून सावरलेले नाहीत.या प्रकरणात श्वेता मात्र सक्रिय होती. सतत तिने या गोष्टीचा पाठपुरावा घेतला मात्र आता या सोशल मीडियावरील तिचे सगळे अकॉउंट तिने डिलीट केल्याची माहिती समोर येत आहे. श्वेताने कोणतेही अकाउंट डिलीट केले नाहीत. आजही ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. मध्यंतरी एक पोस्ट लिहित श्वेता यांनी आपण सोशल मीडियापासून 10 दिवसांचा ब्रेक घेत असल्याचे म्हटलं होते.
भावाला गमावल्यानंतर त्या दु:खातून स्वत:ला सावरण्यासाठी आपण हा ब्रेक घेत असल्याचे श्वेता सिंह यांनी म्हटलं होते. तुर्तास सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला होता. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आले होते.
सुशांत प्रकरणी ED पुन्हा अॅक्शन मोडमध्ये, दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या घरावर छापा
सुशांत प्रकरणाचा तपास करणा-या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुन्हा अॅक्शन मोडमध्ये येत दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या घरी व ऑफिसमध्ये छापेमारी केली. सुशांतने दिनेशसोबत ‘राब्ता’ हा सिनेमा केला होता. या सिनेमात सुशांत व क्रिती सॅनन लीड रोलमध्ये होते. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, ‘राब्ता’ या सिनेमाबाबत झालेल्या पैशांच्या व्यवहारासंबंधी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिग्दर्शक दिनेश यांची चौकशी केली. त्यांच्याकडून काही कागदपत्रही ताब्यात घेण्यात आलीत.
रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा!!
चार महिन्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. सीबीआय, ईडी, एनसीबी अशा तपास यंत्रणा अद्यापही सुशांतप्रकरणाचा तपास करत आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या खात्यांमध्ये अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त केला होता. रिया चक्रवर्तीने सुशांतला लुबाडल्याचा आरोपही सुशांतच्या कुटुंबीयांनी केला होता.यानंतर ईडीची सुशांत प्रकरणात एन्ट्री झाली होती.