Join us

सुशांत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी ट्विटरकडून मागविला 6 महिन्यांचा रेकॉर्ड, CA सोबतही केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 1:57 PM

सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 पेक्षा जास्त लोकांचा जबाब नोंदवला आहे.

 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलीस दिवसरात्र झटत आहे. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू गळफास लावून झाल्याचे समोर आले. तसेच सुशांतच्या सोशल मीडियावरील अकाउंट्सचाही तपास सुरू आहे. यादरम्यामान वांद्रे पोलिसांनी सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संजय श्रीधरचीदेखील चौकशी केली. जेणेकरून सुशांतचे फायनेशिएल रिकॉर्डही तपासले.

सुशांत सिंग राजपूतचा सीए संजय श्रीधरसोबत बुधवारी वांद्रे पोलिसांनी चौकशी केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी 25 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. यात सुशांतचा क्रिएटिव्ह मॅनेजर आणि मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, रोहिणी अय्यर यांच्याशिवाय त्याच्या कुटुंबातील लोक व मित्रांचा समावेश आहे.

मुंबई पोलीस ट्विटरलादेखील नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत. खरेतर सुशांतच्या निधनानंतर असे वृत्त आले की सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही वेळेआधी त्याने काही ट्विट केले होते. जे नंतर डिलिट करण्यात आले होते. सुशांतच्या या ट्विटबाबत चौकशी केली जाणार आहे. याशिवाय त्याचे ट्विटर अकाउंटही तपासले जाणार आहे.

यापूर्वी पोलिसांना काही प्रोडक्शन कंपनींना नोटीस पाठवून चौकशी केली होती. सुशांतशी निगडीत सर्वांची चौकशी केली जात आहे. यादरम्यान सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला नियुक्त करावे अशी मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारदेखील सुशांतच्या आत्महत्येला हत्या म्हणत सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाइड नोट ठेवली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येवर बरेच लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतट्विटर