अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. जगभरात सुष्मिताचे चाहते आहेत. अनेकांसाठी सुष्मिताही आदर्श आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत आहे. खुद्द सुष्मितानेच सोशल मीडियावर तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते.तेव्हा चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला होता. आता पुन्हा एका व्हिडीओमुळे सुष्मिता चर्चेत आली आहे. यावेळी कारणही खास आहे. व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये सुष्मिता सोबत तिच्या दोन्ही दत्तक मुली दिसत आहेत. पिवळा टी-शर्ट, निळी जीन्स आणि लाल मास्क घातलेला हा चिमुरडा एक टक कॅमेराकडे पाहतोय. या व्हिडीओमध्ये अलिसा आणि रेनीच्या चेहऱ्यावरचा आनंदही स्पष्ट दिसत आहे. आता सुष्मिता तिच्या चाहत्यांना या तिसऱ्या मुलाबद्दल माहिती कधी देणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
हा व्हिडीओ पाहून चाहतेही संभ्रमात पडले आहेत. चाहत्यांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे. दोन मुलींनंतर सुष्मिताने आता तिसरा मुलगा दत्तक घेतल्याचे चर्चा रंगत आहेत. यावर अजुनतरी सुष्मिताने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. व्हिडीओ पाहून चाहते स्वतःचा अंदाज लावताना दिसत आहेत. सुष्मितावर सोशल मीडियावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुष्मिता सेनला लहान मुलांची खूप आवड आहे आणि हे प्रेम तिच्या खऱ्या आयुष्यातही दिसून येते. याआधी सुष्मिता सेनने दोन मुलींचे एकट्याने पालनपोषण केले आहे.त्यामुळे आता तिसरा मुलगा दत्तक घेतल्याने चाहतेही प्रचंड खुश आहेत.
जेव्हा सुष्मिता सेनने तिची पहिली मुलगी रेनीला दत्तक घेतले तेव्हा सुष्मिता अवघ्या 25 वर्षांची होती. रेनीला सुष्मिताने 2000 मध्ये आणि एलिसाला 2010 मध्ये दत्तक घेतले होते. मात्र, सुष्मिताने हे सत्य आपल्या दोन्ही मुलींना सांगितले आहे जेणेकरुन हे सर्व जाणून दोघी मोठ्या झाल्यानंतर दोघींना वाईट वाटणार नाही म्हणून लहान असतानाच सुष्मिताने सत्याची जाणीव दोघींना करुन दिली आहे.