सुश्मिता सेन आणि तिचे झालेले अफेअर, ब्रेकअप्स यांच्याविषयीच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. अनेकदा तिचे बाेल्ड स्टेटमेंट्सही यासाठी कारणीभूत असतात. सुश्मिताचं व्यक्तीमत्त्व तसं बोल्ड आणि बिंधास्त. त्यामुळे तिच्याभोवती वेगवेगळ्या चर्चांची वेगवेगळी वलयं नेहमीच फिरत असतात. आता पुन्हा एककदा सुश्मिता चर्चेत आली आहे. यशाच्या शिखरावर असतानाही ही अभिनेत्री अजूनही सिंगल आहे की कुणाला डेट करतेय, याविषयी स्वत: सुश्मिताने खुलासा केला आहे.
सुश्मिता सेनही वयात 15 वर्षांचे अंतर असूनही आपल्यापेक्षा लहान रोहमन शॉच्या प्रेमात पडली होती. दोघांचेही एकमेकांवर अतोनात प्रेम होतं. कुणाचीही पर्वा न करता त्यांनी उघडपणे प्रेमाची कबुली दिली. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2021 मध्ये सुश्मिताने रोहमनपासून वेगळे होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं.
यानंतर आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी सुश्मितासोबतचे वैयक्तिक फोटो शेअर करत त्यांच्या अफेअरचा खुलासा केला होता, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, त्याचंही नात टिकलं नाही. यानंतर अभिनेत्री पुन्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. मात्र, तसे नाही.
गेल्या तीन वर्षांपासून सुश्मिता सिंगल असल्याचा खुलासा तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. रिया चक्रवर्तीच्या चॅट शोमध्ये सुष्मिता म्हणाली, 'सध्या माझ्या आयुष्यात कोणीही पुरुष नाही. मी काही काळापासून सिंगल आहे. मला सिंगल राहून आता जवळपास 2 वर्षे झाली आहेत. माझ्या आयुष्यात काही चांगले मित्र आहेत', असे ती म्हणाली.