अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप, नंतर ललित मोदींबरोबर लग्नाच्या चर्चा आणि नुकताच हृदयविकाराचा धक्का यामुळे ती कायमच प्रसिद्धीझोतात आहे. सुष्मिता सिंगल मदर आहे. तिने लग्न न करता काही वर्षांपूर्वीच दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. आता तिची मोठी मुलगी रेने सेन (Renee Sen) स्टाईलच्या बाबतीत आईलाही मागे टाकत आहे. रेने सेनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सुष्मिताने 2000 साली रेने ला दत्तक घेतले तर 2010 साली तिने दुसरी मुलगी अलिझेला दत्तक घेतलं. दोघींचा तिने एकटीने सांभाळ केला. रेने सेनचा इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल होतोय. तिने लॉंग स्टायलिश गाऊन घातला असून ती एका सोफ्यावर बसली आहे आणि कॅमेऱ्याकडे बघत पोज देत आहे. नेटकऱ्यांना रेनीचा लुक भलताच आवडला आहे.
रेने सेन देखील तिच्या आईसारखीच टॅलेंटेड आणि स्टायलिश आहे. 'लुक्समध्ये आईपेक्षाही एक पाऊल पुढे','तू तर पुढची मिस युनिव्हर्स बनू शकते' अशा कमेंट्स तिच्या फोटोवर आल्या आहेत. रेने सेनने 'सुट्टाबाजी' या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. १३ मिनिटांच्या या फिल्ममध्येही तिने आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. येत्या काही दिवसात रेने आणखी काही प्रोजेक्ट्समध्ये दिसण्याची शक्यता आहे.