सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री चारू असोपा हिच्यासोबत बंगाली पद्धतीने त्याने लग्नगाठ बांधली. गोव्यात थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लग्नानंतर आता नववधूच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत सुश्मिता सेनची आई नव्या सुनेचे स्वागत करताना दिसतेय.
चारू ही टेलिव्हिजनची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. २००९ मध्ये ‘अगल जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मेरे अंगने में’ आणि ‘जीजी मां’ या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली. सध्या ती ‘विक्रम बेताल’ या मालिकेत काम करतेय.
२०१६ मध्ये चारूने नीरज मालवीयसोबत साखरपुडा केला होता. ‘मेरे अंगने में’ या मालिकेत चारू व नीरज यांनी बहीण-भावाची भूमिका साकारली होती. या सेटवर दोघांत प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच हे नाते तुटले. नीरजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर चारूच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली. राजीव हा पेशाने मॉडेल आहे.