Join us

सुश्मिता सेन व रोहमन शॉलने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

By रूपाली मुधोळकर | Published: November 04, 2020 10:28 AM

चर्चा जोरात...

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सुश्मिता तिच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. तशीही ती तिच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते.

सुश्मिता सेन व तिचा बॉयफे्रन्ड रोहमन शॉल बॉलिवूडचे एक चर्चित कपल आहे. बाहेर दिसले रे दिसले की, पापाराझींचे कॅमेरे त्यांच्यामागे पडतात. अलीकडे सुश्मिताला गाडीपर्यंत सोडण्यासाठी रोहमन बाहेर आला. यावेळी दोघांमध्ये जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री दिसली. सुश्मिताने रोहमनला आधी किस केले आणि नंतर त्याला हग केले. दोघांनी फोटोग्राफर्सला पोजही दिली. यादरम्यान असे काही दिसले की, सुश व रोहमनने साखरपुडा केल्याच्या चर्चेला उधाण आले.

होय, रोहमन व सुश्मिता दोघांच्याही रिंग फिंगरमध्ये अंगठी दिसली.   ही अंगठी पाहून चाहत्यांनी सुशवर प्रश्नांचा भडीमार केला. साखरपुडा झाला का? असा सवाल चाहत्यांनी विचारला. अद्याप सुश वा रोहमन यांच्यापैकी कोणीही साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण चर्चा मात्र जोरात आहेत.

काही दिवसांपूर्वी सुश्मिता तिच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. तशीही ती तिच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते. अद्याप अविवाहित असेलेली सुश्मिता दोन मुलींची आई आहे. तिने या दोन मुलींना दत्तक घेतलेआहे. दीर्घकाळापासून ती मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.  

अशी सुरु झाली होती सुश- रोहमनची लव्हस्टोरीरोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. होय, रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला.

या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे आॅप्शन कधी ओपन करत नव्हती.( हा आॅप्शन ओपन केल्यावर मॅसेज पाठवणा-यास ‘वेलकम इन माय पर्सनल स्पेस’ अशा आशयाचा मॅसेज जातो.) एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे आॅप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. सुश्मिताचा रिप्लाय आलेला पाहून रोहमनचे काय व्हावे? त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मग काय मॅसेजचा हा ‘सिलसिला’ सुरु झाला. यानंतर रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली. आता तर हे नाते बरेच पुढे गेले आहे.

सुश्मिता सेनची लेक रिनी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, या सिनेमातून होतोय डेब्यू

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल