Join us

Sushmita Sen Wedding: सुश्मिता सेन लवकरच लग्नबंधनात अडकणार, वाचा बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:38 PM

होय, भावाच्या लग्नानंतर सुश्मिताही लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे कळतेय.

ठळक मुद्देरोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. 

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मध्यंतरी ब-याच गाजल्या. पण काहीच दिवसांत सुश आणि रोहमन यांनी ब्रेकअपच्या बातम्या खोट्या ठरवल्या आणि थेट व्हॅकेशनवर पोहोचले. या व्हॅकेशनचे फोटो तुम्ही पाहिलेच. आता सुश्मिता व रोहमनबद्दल आणखी एक ताजी बातमी आहे. होय, भावाच्या लग्नानंतर सुश्मिताही लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे कळतेय.वोगने (Vogue) याबद्दलचा खुलासा केला आहे. वोगने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी अखेरिस म्हणजे डिसेंबर महिन्यात हे कपल लग्न करू शकते. रोहमनने कधीच सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि सुशनेही त्याचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे.

काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती. सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रोहमनच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर सुश्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. पण नंतर या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.

अशी झाली होती पहिली भेट

 रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. होय, रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन कधी ओपन करत नव्हती.( हा ऑप्शन ओपन केल्यावर मॅसेज पाठवणा-यास 'वेलकम इन माय पर्सनल स्पेस' अशा आशयाचा मॅसेज जातो.) एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. सुश्मिताचा रिप्लाय आलेला पाहून रोहमनचे काय व्हावे? त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मग काय मॅसेजचा हा 'सिलसिला' सुरु झाला. यानंतर   रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली. 

टॅग्स :सुश्मिता सेन