बॉलिवूडची ही अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक हॉलिडे एन्जॉय करतेय. मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर डान्स मुव्हज करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. आम्ही बोलतोय, सुष्मिता सेनबाबत. सध्या ती बॉयफ्रेंड रोमहन शॉलसोबत मालदीवमध्ये रिलेक्स करतेय. सुष्मिताचे हे फोटो तिची मुलगी आलिया सेनने काढले आहेत.
रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती.
रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली.