Join us  

Sushmita Sen Lalit Modi: ललित मोदीसोबत 'डेटिंग'च्या चर्चा रंगलेल्या असतानाच सुश्मिता सेनने शेअर केला Bold Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:02 PM

सुश्मिताने पोस्ट केलेला मालदीव मधील असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

Sushmita Sen Lalit Modi: ललित मोदीच्या ट्वीटने खळबळ माजली असतानाच बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेननेहीललित मोदीसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर त्यांच्या नातेसंबंधावर मौन सोडले. लग्न किंवा साखरपुडा अशा शक्यतांना तिने पूर्णविराम दिला. त्याच वेळी, तिने त्यांच्या नात्याचा मात्र खुलेपणाने स्वीकार केला. या नात्याचा स्वीकार केल्यानंतर आता सुश्मिता सेनने एक बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले.

सुश्मिता सेनने इन्स्टाग्रामवर आपल्या अधिकृत अकाऊंटवर जाळीदार नाईटी परिधान केलेला फोटो पोस्ट केला. अभिनेत्रीचा हा फोटो याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण एकीकडे तिच्या आयुष्यात नव्या नात्याचा उलगडा होताना दिसतोय. तर दुसरीकडे तिचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांचा घटस्फोट होत आहे. अशा परिस्थितीत सुश्मिता सेनने एक बोल्ड फोटो शेअर केल्याने बी टाऊनमध्ये गॉसिप सुरू झाले आहे.

सुष्मिता सेनचा हा फोटो मालदीवचा आहे. या फोटोमध्ये सुश्मिताने जाळीदार पांढऱ्या रंगाची नाईटी परिधान केलेली दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'शांतता आणि गोंधळाचा आवाज कमी करण्याची शक्ती असलेली जागा. यासोबतच तिने लव्ह यू गाईज, असं लिहिलं आहे. या फोटो अलिया सेन हिने काढल्याचंही तिने यात म्हटलं आहे.

टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदीबॉलिवूडइन्स्टाग्राम