सुश्मिता सनने अलीकडेच आपला 45वा वाढदिवस सेलिब्रेट केला. चाहत्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी सुश्मितावर बर्धडेच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. वयाच्या 45व्या वर्षी देखील सुष्मिता फिटनेस फ्रिक आहे. शुक्रवारी तिने सोशल मीडियावर एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सुश्मिताचा बॅलेन्स पाहण्यासारखा आहे. तिने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, 'मी 45वर्षांची झाली याचा मला अभिमान आहे. तुम्ही लोक गेली 25 वर्षे माझ्या भावनिक बळकटीचे मूळ आहात आणि ते पुढेही सुरूच राहिल. आयुष्य म्हणजे किती मोठा आशीर्वाद आहे. मी इच्छा आहे की तुम्ही लक्षात ठेवला की, आपल्या बिनशर्त प्रेम आणि दयाळूपणाने मला आयुष्य जगण्यासाठी आणि एक चांगले व्यक्ती होण्यासाठी सामर्थ्य दिले आहे. फक्त चांगल्या गोष्टी पसरवत रहा… मला आणि या जगाला आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. मी तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम करते.'
सुश्मिताने वयाच्या 27व्या वर्षी पहिली मुलगी रिनीला दत्तक घेतले. यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतले.सुश्मिता सध्या रोहमन शॉल या पेशाने मॉडेल असलेल्या तरूणाला डेट करतेय. त्याच्यासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो ती शेअर करत असते.