Join us

सुश्मिता सेनच्या वहिनीचा ट्रेडिशनल लूक पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 3:53 PM

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने गेल्यावर्षी 7 जूनला अभिनेत्री चारू असोपासोबत कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर 16 जूनला दोघांचाही पारंपरिक लग्नसोहळा पार पडला होता.

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा तिच्या स्टायलिश लूकमुळे सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असते. नुकताच तिने ट्रेडिशनल अंदाजातील लूक शेअर केला आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर चाहत्यांसाठी आकर्षण ठरत आहे.  नेहमीच ती आपल्या स्टायलिश लूकने रसिकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे वेस्टर्न असो पारंपरिक दोन्ही अंदाजात तिच्या चाहते फिदा होतात.

 

blockquote class="instagram-media" data-instgrm-captioned data-instgrm-permalink="https://www.instagram.com/p/CEMRqJaHRfo/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="13" >

View this post on Instagram

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu)

राजस्थानी पेहरावात तिचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसून येत आहे. राजस्थानी  पारंपरिक लेहंगा, गळ्यात हार,भरजरी दागिने, नाकात नथ, पेहरावास साजेशी अशी केशरचना या सगळ्यामुळे चारू असोपाचे सौंदर्य खुलून गेले आहे. या फोटोवर  फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय.  एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी चारू पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच  सुंदर दिसत आहे.

 

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.  याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे सोशल मीडियावर चारू असोपाचाही  स्टाइलचा बोलबाला पाहायला मिळत आहे. चारू असोपाही अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी आहे. 

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने गेल्यावर्षी 7 जूनला अभिनेत्री चारू असोपासोबत कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर 16 जूनला दोघांचाही पारंपरिक लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. पण वर्षभरातच राजीव व चारूच्या संसारात कुरबुरी सुरू झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अशात चारूने तिच्या सोशल अकाऊंटवर काही पोस्ट शेअर केली आणि या चर्चांना आणखी जोर चढला.

चारू व राजीव गेल्या अनेक दिवसांपासून वेगळे राहत असल्याचे कळतेय. चारूने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ‘सेन’ हे सरनेमही हटवले आहेत. अशात चारूची पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. ‘बहुत हंसते हो, टूटे हो क्या,’ असे चारूने लिहिले. तिच्या या पोस्टने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत.

टॅग्स :सुश्मिता सेन