ऐश्वर्या राय ही मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला होता, तर सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. या दोघी ही 1994मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्या होता. त्यावेळी ऐश्वर्या रायचे सौंदर्य असे होते की बऱ्याच मुलींनी भीतीपोटी आपलं नाव मागे घेतले होते, मात्र त्याच वर्षी ऐश्वर्या रायला हरवत ती स्पर्धा सुश्मिता सेनने जिंकली होती. तेव्हा केवळ सुश्मिता 18 वर्षांची होती. सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या रॉय दोघेही मिस इंडिया होण्याच्या प्रबळ दावेदार होत्या. सुश्मिता स्वत: हे मान्य करत होती की ऐश्वर्या राय तिच्यावर भारी पडू शकते कारण ती खूप सुंदर आहे.
मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टाय झाली होती. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढले होते की, कोणाच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकुट असेल. जजने दोघांनी 9.33 नंबर दिले होते. यानंतर दोघांनी एक-एक प्रश्न विचारण्यात आला. ऐश्वर्या रायला विचारण्यात आले की, जर तुला पतीच्या चांगल्या गुण्याबाबत विचारले गेले तर तू 'द बोल्ड'मधील Ridge Forrester आणि 'सांता बरबरा'मधील Mason Capwell या दोनपैकी कोणत्या कॅरेक्टर प्राधान्य देशील. त्यावेळी ऐश्वर्याने Mason Capwell हे उत्तर दिलं होतं.
त्याचवेळी सुष्मिताला भारताच्या वस्त्रोद्योगाविषयी प्रश्न विचारला गेला होता. ज्याचे उत्तर देताना ती म्हणाली होती पोशाखाचा वारसा महात्मा गांधींच्या काळापासून सुरू झाला. या प्रश्नाचे चोख उत्तर देत सुष्मिताने हा किताब आपल्या नावावर केला.
मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिता सिनेमा आणि बॉलिवूडकडे वळली. सध्या सुष्मिता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. रोहमन शॉलसोबती ती रिलेशनशीपमध्ये आहे. दोघे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.