सध्या सिनेमागृहात न जाता ओटीटी वरच चित्रपट आणि वेबसिरीज बघण्याचे प्रमाण वाढले आहे. सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटीवर येतोय याची सर्वजण वाट बघत असतात. घरी बसून मस्तपैकी सिनेमा आणि वेब सीरिजचा आनंद लुटण्यासाठीही प्रेक्षक तयार असतात. या आठवड्यात प्रेक्षकांना थ्रिलर चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहता येणार आहेत.
चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली
जर तुम्ही सस्पेन्सने भरलेल्या चित्रपटाच्या शोधत असाल तर 'चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली' हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते. हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी Sony Liv वर प्रदर्शित होत आहे. ही कथा प्रसिद्ध लेखिका अगाथा क्रिस्टी यांच्या द सिटाफोर्ड मिस्ट्री या कादंबरीवर आधारित आहे. ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह, गुलशन ग्रोवर, पाउली डॅम, रत्ना शाह यांसारखे कलाकार दिसणार आहेत.
हॉस्टल डेज सीजन
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवनावर ही सीरीज आहे. या प्रकारच्या कथा तुम्हाला आवडत असतील 'हॉस्टेल डेज सीझन ४' ही वेबसीरिज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. २७ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. भिनव आनंद दिग्दर्शित या शोचे सहा भाग आहेत.
किंग ऑफ कोठा
हा चित्रपट २८ सप्टेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. जी एक धाडसी पोलिस आणि गुंडाची कहाणी आहे. दुलकर सलमान हा साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे, ज्याचे चित्रपट चाहत्यांना नेहमी पाहायला आवडतात. 'सीता-रामम' या चित्रपटात त्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला होता.
कुमारी श्रीमती
कुमारी श्रीमती ही वेबसीरिज २८ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर रिलीज होईल. ही एका मुलीची कथा आहे जिला जुनी विचारसरणी बदलून स्वतःच्या अटींवर जगण्याची इच्छा असते.
एजंट
अखिलेश अक्किनेनी आणि मामूट्टी यांचा डबल धमाका सोनी लिव्हवर २९ सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला गुप्तहेर असलेले चित्रपट पाहायला आवडत असतील तर 'एजंट' तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
चुना
नेटफ्लिक्सवर २९ सप्टेंबरला येणारी ही वेब सीरिज रिलीज होईल. काही विशेष करू शकत नसताना दरोडा टाकण्याचा प्लॅन ते आखतात, अशी ही कथा आहे.
तुमसे ना हो पायेगा
डिस्ने प्लस हॉटस्टारवर महिमा मकवानाची 'तुमसे ना हो पायेगा' ही वेब सीरिज 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये इश्वाक सिंग, महिमा मकवाना, गौरव पांडे, गुरप्रीत सैनी आणि करण जोतवानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.