Join us

"मी तुझ्या प्रेमात वेडी आहे...", सुझैन खानची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, EX पती हृतिक रोशनची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:10 IST

सुझैन खानच्या पोस्टवर हृतिकच्या कमेंटने वेधलं लक्ष

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझैन खान (Sussanne Khan) यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांनी आपला १४ वर्षांचा संसार मोडला. सध्या हृतिक सबा आजादला डेट करत आहे तर सुझैन अर्सलान गोनीसोबत (Arslan Goni) रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे हे चौघंही एकत्र पार्टी करतात, हँगआऊट करतात. अर्सलान गोनीने कालच आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त सुझैन खानने त्याच्यासाठी रोमँटिक पोस्ट लिहिली. या पोस्टवर हृतिकनेही कमेंट केली आहे. 

सुझैन खानने बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोंचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "मला जर आयुष्यात काही हवं असेल तर ते तू आहेस. हॅपी बर्थडे मेरी जान. तू मला या जगातली सर्वात आनंदी महिला बनवलं आहेस. प्रत्येक दिवशी... मी प्रार्थना करते आणि मला माहित आहे की तुझ्या आयुष्यात सर्वात चांगली वेळ सुरु होत आहे. ही वेळ आतापासून सुरु होत असून कायम अशीच राहणार आहे. मी तुझ्या प्रेमात वेडी आहे आणि आणखी होत आहे. "

या पोस्टवर हृतिकने कमेंट करत लिहिले, 'हॅपी बर्थडे मित्रा'. यावर अर्सलान त्याचे आभार मानले. तसंच त्याने कमेंटमध्ये सुझैनसाठी लिहिले, 'थँक यू माय लव्ह'. सुझैनच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, 'ही हृतिकला जळवायचा प्रयत्न करत आहे का?','ही आधी हृतिकसाठीही अशाच पोस्ट लिहायची','हे म्हातारे अजूनही टीनएज सारखे प्रेमात कसे पडतात यावर विश्वासच बसत नाही.'

टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खानबॉलिवूडरिलेशनशिपसोशल मीडियाट्रोल