जेव्हापासून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुजैन खान (Sussanne Khan) वेगळे झाले आहेत तेव्हापासून ती अरसलान गोनीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मात्र यावेळी सुझैन खानच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे या चर्चांनी जोर धरला आहे. तिच्या या पोस्टवर तिचा एक्स नवरा हृतिक रोशन आणि कंगना राणौत (Kangana Ranaut) यांनी कमेंट केली आहे. त्यांच्या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुजैन खान आणि अरसलान गोनी (Arslan Goni) रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना जोर तेव्हा धरला जेव्हा त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र कॉमन फ्रेंड्स ग्रुपसोबत स्पॉट केले गेले. इतकेच नाही तर गोव्यावरून परतत असतात एअरपोर्टवरदेखील ते दोघे एकत्र दिसले. मात्र आता तर सुजैनच्या पोस्टने या चर्चेला दुजोरा दिला आहे. अरसलान गोनीच्या वाढदिवसादिवशी सुजैन खानने त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. अरसलानच्या वाढदिवसादिवशी सुजैनने त्याच्या सोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, हॅप्पी हॅप्पी हॅप्पीएस्ट बर्थडे... मी तुझ्यासाठी अशी दुनिया मागते आहे जिथे प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी बेस्ट असेल जे तु डिझर्व्ह करतो. तुझ्या चहूबाजूला खूप आनंद आणि खरे प्रेम असतो. तू खूप छान उर्जा आहेस, ज्याला मी भेटली आहे. अमर्याद तेजस्वीपणे चमकत राहा.