Join us

 हृतिक रोशन व सुजैन खानला पुन्हा एकत्र पाहू इच्छितात संजय खान! वाचा, काय म्हणाले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 12:18 IST

मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमी आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण सुजैन खानचे डॅड संजय खान मात्र यावर बोलले.

बॉलिवूडच्या परफेक्ट कपलबद्दल बोलायचे झाले की, शाहरूख-गौरीनंतर हृतिक रोशन व सुजैन खान यांचेच नाव याचचे. एकेकाळी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी हे एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये कायदेशीर घटस्फोट घेत हा निर्णय अमलातही आणला. अर्थात घटस्फोटानंतरही हृतिक व सुजैन आपल्या मुलांसोबत कधी एकत्र सुट्टी घालवताना तर कधी मुव्ही डेट वा डिनर डेट एन्जॉय करताना दिसते. मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमीही आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण सुजैन खानचे डॅड संजय खान मात्र यावर बोलले. हृतिक व सुजैन पुन्हा एकत्र यावेत, अशी मनातील इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

संजय खान यांच्या ‘ द बेस्ट मिस्टेक आॅफ माय लाईफ’ या बायोग्राफीचे प्रकाशन अलीकडेच झाले. या पार्श्वभूूमीवर संजय खान यांनी अलीकडे हिंदुस्तान टाईम्सला मुलाखतीत दिली. या मुलाखतीत हृतिक व सुजैनच्या घटस्फोटावरही ते बोलले. घटस्फोट ही अतिशय वेदनादायी गोष्ट आहे. मी अद्यापही सुजैनला तिने हृतिकपासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, ते विचारलेले नाही. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे ते म्हणजे, हृतिक व सुजैनच्या मुलांवर त्यांच्या निर्णयाचा कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाही.  अर्थात हृतिक-सुजैनचे प्रयत्नामुळेचे हे शक्य झाले आहे. ते एकत्र मुलांसोबत वेळ घालवतात. त्यांच्या एकत्र काळजी घेतात.मी आजही सुजैनइतकेच हृतिकवरही पे्रम करतो. हृतिक आता तुमचा जावई राहिला नाही, याची मला अनेक लोक आठवण करून देतात. अशावेळी तो अजूनही माझ्या नातवांचा वडिल आहे आणि हे नाते कधीच संपणारे नाही, असे मी त्यांना म्हणतो. शेवटी हृतिक व सुजैन पुन्हा एकत्र यावेत, अशी आजही माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :हृतिक रोशनसंजय खान