Join us

स्वरा भास्कर अभिनयासोबत 'या' क्षेत्रात आजमावणार नशीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 8:00 PM

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आजवर तिच्या अभिनयकौशल्यासह सामाजिक विषयांवरील निर्भीड टिपणीसाठी ओळखली जाते.

ठळक मुद्देअभिनयासोबत आता स्वरा एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.स्वराने साकारलेल्या हटके आणि बोल्ड भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आजवर तिच्या अभिनयकौशल्यासह सामाजिक विषयांवरील निर्भीड टिपणीसाठी ओळखली जाते.  अभिनयासोबत आता स्वरा एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच स्वराने तिचा भाऊ ईशान भास्करसोबत मिळून स्वतःचे 'कहानीवाले' हे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. 'अनारकली ऑफ आराह', 'निल बटे सन्नाटा', 'वीरे दी वेडिंग' यांसारख्या सिनेमांमधील स्वराने साकारलेल्या हटके आणि बोल्ड भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. विशेषतः लेखक आणि निर्माते तिच्याकडे नेहमीच मनोरंजक आणि लक्षवेधक कथा घेऊन येत असतात.

या सगळ्याचा विचार करता, स्वरा या स्वतः दमदार परफॉर्मरने जाणीवपूर्वक निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 'गेल्या दीड वर्षांपासून कहानीवालेवर आमचे काम सुरु होते. वेगळ्या, नवीन आणि प्रभावी कथा मांडण्यासाठी ज्या चांगल्या लेखकांना आणि फिल्ममेकर्स योग्य ते व्यासपीठ मिळत नाही त्यांना पाठिंबा देणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे' असे स्वरा सांगते.

ईशान भास्कर सांगतात, 'आमच्या दिल्लीच्या घरातील अमृता शेरगील यांच्या द ऐंशिअंट स्टोरी टेलर या पेंटिंगचा स्वरा आणि माझ्यावर आधीपासूनच खूप प्रभाव होता. या पेंटिंग मागचे मुख्य उद्दिष्ट हे नवीन, ताज्या, इतरांपेक्षा वेगळ्या आणि  रंजक कथा सांगणे हे होते. स्वरा आणि मी आम्हा दोघांची चित्तवेधक कथांची निर्मिती करण्याची इच्छा आहे. त्यामुळे कहानीवालेच्या सेट अपची संधी मिळणे हे आमच्या दृष्टीला पूरक ठरले'.

टॅग्स :स्वरा भास्करवीरे दि वेडिंग सिनेमा