Join us  

Gayatri Joshi : 'स्वदेस' सिनेमातली शाहरुखची हिरोईन आता कुठे असते? फिल्म इंडस्ट्री सोडली अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:50 AM

डेब्यू सिनेमातच प्रेक्षकांची वाहवा मिळवून गायत्री जोशी अचानक सिनेइंडस्ट्रीतून गायबच झाली. 

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 2004 मध्ये आलेला 'स्वदेस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला. या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) आता कुठे आहे असा प्रश्न पडला असेल. डेब्यू सिनेमातच प्रेक्षकांची वाहवा मिळवून गायत्री अचानक सिनेइंडस्ट्रीतून गायबच झाली. 

गायत्रीने 2005 साली विकास ओबेरॉयसोबत लग्नगाठ बांधली. विकास ओबेरॉय मोठे उद्योजक असून त्यांची रिअल इस्टेट टायकून अशी ओळख आहे. त्यांची मुंबईत रिअर इस्टेट फर्म आहे. गायत्री सुद्धा त्यांचा बिझनेस सांभाळते. गायत्रीने एका मुलाखतीत सांगितले, 'स्वदेश सिनेमानंतर मला अनेक संधी मिळतील असे वाटले होते. पण अनेकदा आपण विचार करतो तसं होतंच असं नाही. मला वाटलं होतं की मी लग्नानंतरही फिल्म्समध्ये काम करेन, पण नंतर कुटुंबासाठी मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. 

'झांझरिया' आणि जगजित सिंग यांच्या वो कागज ती कश्ती या गाण्यात गायत्री दिसली होती. विशेष म्हणजे ती 1999 मध्ये मिस इंडियामध्ये सहभागी झाली होती आणि टॉप 5 पर्यंत मजल मारली. मात्र गायत्रीने स्वदेशच्या रिलीजनंतर एका वर्षातच संसार थाटला आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला.

टॅग्स :सिनेमाशाहरुख खानबॉलिवूड