सुशांत सिंग राजपूतने गेल्या 14 जूनला जगाला अलविदा म्हटले. सुशांतच्या मृत्यूला 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला पण अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. सुशांत प्रकरणाचा तपास करता करता एनसीबी बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनपर्यंत पोहोचली आणि सुशांत प्रकरणावरून सगळा फोकस बॉलिवूडच्या या ड्रग्ज प्रकरणावर केंद्रीत झाला. ड्रग्ज प्रकरणी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह या बड्या अभिनेत्रींची नावे समोर आल्यानंतर तर खळबळ माजली. या अभिनेत्रींच्या एनसीबी चौकशीत पुन्हा एकदा सुशांतचे नाव समोर आले. सुशांत व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्ज घ्यायचा, असा खुलासा सारा व श्रद्धाने चौकशीत केला. या पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे. स्वराने एक न्यूज आर्टिकल शेअर करत, काहीशा नाराजीच्या सूरात ट्विट केले.
सुशांतला ड्रग्ज घेताना पाहिले होते...
एनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!!
श्रद्धा कपूरनेही दिली कबुलीश्रद्धा कपूरने एनसीबीसमोर असे मान्य केले आहे की तिने सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिले आहे. छिछोरे सिनेमाच्या सक्सेस पार्टीत मी गेले होते. तिथे काही लोकांनी ड्रग्ज घेतली. पण मी घेतली नाही, असे श्रद्धाने यावेळी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!!ड्रग्जप्रकरणी दीपिका पादुकोण काल शनिवारी एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाली. सुमारे पाच तास तिची चौकशी झाली. यावेळी दीपिकाला एनसीबीच्या अनेक कठोर व कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला. या प्रश्नांचा भडीमार सहन करत असताना दीपिकाला एकदा नाही तर तिनदा रडू कोसळले.इंडिया टुडेने एनसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका शनिवारी सकाळी 10 वाजता एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली.यानंतर लगेच तिच्या चौकशीला सुरुवात झाली. यादरम्यान, ड्रग्जसंदर्भात आपण चॅट केले होते, असे तिने कबुल केले. मात्र स्वत: ड्रग्ज घेत असल्याचा इन्कार केला़ चौकशीत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले जात असताना दीपिकाला अचानक रडू कोसळले. असे एकदा नाही तर तीनदा झाले़ तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत.