बॉलिवूडमध्ये कलाकार हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं बिनधास्तपणं मांडतात. यामुळे अनेकवेळा कलाकारांमध्येही मतभेद होतात. सोशल मीडियावर स्वरा भास्कर आणि विवेक अग्निहोत्री पुन्हा आमने सामने आलेत. दोघांमध्ये मतभेद होण्याची ही पहिलीच वेळ नाही आधीही अनेकवेळा दोघांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्री आणि फॅक्ट चेक करणार पत्रकार मोहम्मद जुबैर यांच्यात विवाद सुरु होता. यानंतर आता स्वरा भास्करने ही विवेक अग्निहोत्रीवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. स्वरा भास्करने आता विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला असून कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते असे सांगितले आहे. जर तुम्ही एक प्रकारचा वैचारिक दृष्टीकोन पाळलात तर तुम्हाला कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही. ती म्हणाली की विवेक अग्निहोत्री सार्वजनिक व्यासपीठावर मुस्लिमांना लक्ष्य करतात आणि त्यांना वाईट म्हणतात. फक्त ते मुस्लिम आहेत म्हणून. आपल्या नव्या भारताचे सामाजिक वातावरण किती विषारी आणि घाणेरडे झाले आहे, याचे हे उदाहरण आहे.
स्वराचे हे ट्विट विवेक अग्निहोत्री आणि पत्रकार मोहम्मद जुबैर यांच्यातील वादानंतर आलं आहे. विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या काश्मीर फाइल्स या चित्रपटासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर जुबेर म्हणाला होता की, हा तो सन्मान नाही जो तुम्ही समजत आहात. विवेक अग्निहोत्रीच्या काश्मीर फाइल्स या चित्रपटाला मिळालेल्या सन्मानाप्रमाणेच हे नाव आहे.
जुबैरच्या या मुद्यावर विवेक अग्निहोत्री संतापले आणि त्यांनी ट्विटरवर पत्रकाराबद्दल वाईटसाईट बोलले. ते म्हणाला, मला फॅक्ट चेकर्स आवडत नाहीत पण जेव्हा एखादा पंक्चर रिपेअरर स्वतःला फॅक्ट चेकर म्हणायचा प्रयत्न करतो तेव्हा मला खूप राग येतो. तू एक जिहादी दलाल आहेस आणि तुझ्या मागे कोण आहे हे मला चांगलं माहीत आहे. प्रत्येक जिहादीचा दिवस येतो आणि तुमचा दिवसही जवळ आला आहे. तेव्हापासून विवेक यांच्या या पोस्टवर ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.