Join us

"असे राजकारणी असणं भारतासाठी..." आदित्य ठाकरेंचं नाव घेत स्वरा भास्करचं ट्विट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:31 IST

स्वरा भास्करनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Swara Bhaskar Praised Aditya Thackeray: बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. तिची काही वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय ठरत असताच. स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने 'छावा' सिनेमाबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती पुन्हा एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं होतं. आता स्वरानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

स्वरा भास्करने यावेळी वादग्रस्त विधान नाही तर तिनं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतंच एका ठिकाणी मुलाखत दिली होती. ही मुलाखत पाहिल्यानंतर स्वरा भास्करने ट्विट शेअर केलं आहे. तिनं लिहलं, "आदित्य ठाकरे हे खूप प्रभावी आणि स्पष्टक्ते आहेत. असे राजकारणी असणं भारतासाठी खूप चागलं आहे", या शब्दात तिनं कौतुक केलं आहे. 

स्वरा भास्कर लग्न झाल्यापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तर स्वराचा पती फहाद अहमदला(Fahad Ahmad) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad pawar) यांच्या पक्षाने अनुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. पण, त्याचा पराभव झाला.  स्वरा भास्कर ही पतीचा प्रचार करतानाही दिसून आली होती. ती अनेकदा भाजपविरोधात आंदोलन करताना दिसली आहे. 2019 मध्ये सीएए आणि एनआरसीच्या कायद्यांविरोधात ती मैदानात उतरली होती. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही ती सामील झाली होती. त्यामुळे स्वरा भास्कर आजवर अनेकदा भाजप विरोधात मैदानात उतरताना दिसली आहे.  

टॅग्स :स्वरा भास्करआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस