Join us

स्वरा भास्करने म्हटले, ‘माफी मागा, अन्यथा कोर्टात खेचणार’, वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 2:26 PM

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रचंड विरोधानंतर २५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज झाला. वादानंतरही हा ...

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रचंड विरोधानंतर २५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज झाला. वादानंतरही हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. शिवाय प्रेक्षक दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंगच्या अभिनयाचे कौतुकही करीत आहेत. मात्र याचदरम्यान अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ‘पद्मावत’ बघितल्यानंतर भन्साळी यांना ओपन लेटर लिहिल्याने एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाली होती. परंतु आता या वादाने वेगळेच वळण घेतले असून, एक वक्तव्य स्वराच्या नावाने पुढे येत आहे. या वक्तव्यामध्ये ‘शत्रूची गुलामी पत्करण्यापेक्षा आत्महत्या केलेली कधीही योग्य!’ असे म्हटले असून, ते स्वराकडून आल्याचे बोलले जात आहे. वास्तविक स्वराने असे वक्तव्य केलेच नसल्याने या सर्व प्रकरणाला वेगळेच वळण मिळताना दिसत आहे. नुकतेच ट्विटर युजर हेमंत प्रताप सिंहने स्वराच्या नावाने एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘मी फक्त हे कन्फर्म करू इच्छितो की, खरोखरच तू हे वक्तव्य केले आहेस काय जे मीडियामध्ये तुझ्या नावाने चर्चिले जात आहे? मला फक्त माझ्या या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, जेणेकरून मी ते व्हायरल करणार नाही.’ या युजरने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये स्वरा भास्करचे एक स्टेटमेंट दिसत आहे. ज्यामध्ये लिहिले की, ‘एका आक्रमणकारी शत्रूकडून गुलाम बनण्यापेक्षा आत्महत्या करणे कधीही योग्य!’ हेमंत प्रताप सिंहच्या ट्विटला उत्तर देताना स्वराने म्हटले की, ‘हे पूर्णपणे खोटं आहे. त्यामुळे अधिकृतपणे माफी मागा, अन्यथा मी कोर्टात जाणार.’ दरम्यान, याअगोदर स्वराने संजय लीला भन्साळी यांना ‘पद्मावत’वरून एक ओपन लेटर लिहिले. या लेटरमध्ये स्वराने जोहर आणि सती प्रथेवर लिहिले होते. स्वराच्या या पत्रावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मीडियामध्ये तर तिच्या या पत्राने खळबळ उडवून दिली. शाहिद कपूरने तर स्वराच्या या पत्राला उघडपणे उत्तर देताना तिच्यावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर संजय लीला भन्साळी यांच्याकडून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती.