Join us

Swara Bhasker : स्वराचं पुन्हा देशाबाबतीत वादग्रस्त ट्वीट, नेटकऱ्याने थेट 'पाकिस्तान'चे तिकीटच स्पॉन्सर केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:43 IST

स्वराने कोमेजलेल्या फुलांचे काही फोटो पोस्ट करत भारताबद्दल वादग्रस्त ट्वीट केले आहे

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमदसोबत (Fahad Ahmed) तिने लग्न केले. स्वरा कायमच असे काही वक्तव्य करते ज्यामुळे ती टीकेची धनी होते. आता तिने केलेल्या एका ट्वीटवरुन नेटकरी भडकले आहेत. 

स्वराने काय ट्वीट केलंय?

स्वराने कोमेजलेल्या फुलांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यावर ट्वीट करत तिने लिहिले,'मी हे आधीही सांगितले आहे, विवेकबुद्धी असणं आणि सध्या भारतात राहणं म्हणजे निराशाजनक रागाच्या स्थितीत जगण्यासारखं आहे. या फुलांनाच बघा...' यासोबत स्वराने ब्रोकन हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.

झालं तर स्वराचं ट्वीट नेटकऱ्यांना प्रचंड झोंबलं. युझर्सने तिचा खरपूस समाचारच घेतला. एकाने लिहिले,'तू सीरिया, इराण, इराक, येमेन किंवा पाकिस्तानचे तिकीट बुक करु शकते...लगेच निघ'. 

तर आणखी एकाने लिहिले,'मग सोप्पं आहे, पाकिस्तानला जा.'

एका युझरने तर थेट तिला पाकिस्तानचं तिकीटच स्पॉन्सर करतो असे सांगितले.तो म्हणाला,'तू आता धर्म बदलला आहेस. तुला पाकिस्तानच आवडणार. पाकिस्तानला जायचं असेल तर तुला वन वे तिकीट स्पॉन्सर करतो.'

स्वरा याआधीही अनेकदा ट्रोल झाली आहे. भारतासंबंधात तिने अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. त्यावरुन ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

टॅग्स :स्वरा भास्करबॉलिवूडट्विटरभारत