Join us

देशाचं स्मशान झालं तरी चालेल, पण 'मालका'ची प्रतिमा मलिन व्हायला नको; स्वरा भास्करचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 2:35 PM

आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या स्वराचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

करोनाची दुसरी लाट आल्याने देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात करोनाची वाढती प्रकरणे आणि ऑक्सिजनची तीव्र कमतरतात लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक घेतली. त्याच वेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वागणुकीवर चिडले, कारण त्यांनी बैठतीत झालेल्या खासगी चर्चेचे थेट प्रसारण केले होते. बैठकीत झालेल्या खासगी चर्चेचे थेट प्रसारण केल्यानं पंतप्रधान यांनी कठोर शब्दांचा वापर करत केजरीवाल यांना सांगितले की तुम्ही महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे. यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हात जोडत माफी मागितली. 

याच मुद्दयावर अंजना ओम कश्यपने 'हल्ला बोल' या डिबेट शोमध्ये राघव चढ्ढा यांना प्रश्न विचारला की लोकांचे प्राण वाचवणे हे महत्वाचे आहे की, अशा परिस्थितीतही आपली इमेज चमकवणे ? यावर उत्तर देताना राघव चढ्ढा म्हणाले, "प्रत्येक वेळी ते पंतप्रधानांच्या बैठकीत थेट लाईव्हच भाषण देतात,  यावेळी गोपनीय, रहस्यमयी किंवा नॅशनल सिक्योरिटीबद्दल चर्चा होत नव्हती, तरी  या गोष्टींमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. "

आजतकने थेट राघव चढ्ढा यांनी जाहीर माफी मागितल्याचे सांगत सगळ्या गोष्टी ट्विटच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले.हे ट्विट पाहून स्वरा भास्करचा मात्र चांगलाच पारा चढला आणि थेट रिट्वीट करत तिनेही निशाणा साधला. वाहवा आजतक राघव चढ्ढा यांनी आणखीही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्या गोष्टीही हेडलाईनमध्ये टाकणे जरा जास्त रिलेव्हंट झाले असते.

 

अंजना कश्यपला या गोष्टीची जरा जास्त मिर्ची झोंबलेली दिसतेय. अरविंद केजरीवाल हे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देशाचे भलेही स्मशानभूमीत रुपांतर होवो, पण आपल्या आकाची प्रतिमा मात्र मलिन होऊ नये. खरंच लाजिरवाणे आहे हे सगळं. आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या स्वराचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

टॅग्स :स्वरा भास्कर