Join us  

"तुझे न्यूड फोटो व्हायरल करेन", 'या' अभिनेत्रीला निर्मात्याकडून मिळाली धमकी, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 2:04 PM

निर्माता संदीप सरकार तिला धमकी देत आहे. न्यूड फोटो व्हायरल करेल अशी धमकी तिला मिळत आहे.

अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने (Swastika Mukherjee) बांग्ला फिल्म शिबपुरच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत स्वस्तिकाने खुलासा केला की, निर्माता संदीप सरकार तिला धमकी देत आहे. न्यूड फोटो व्हायरल करेल अशी धमकी तिला मिळत आहे. स्वस्तिकाने याप्रकरणी गेल्या महिन्यात पोलिसात तक्रार केली. मात्र पुढे काहीच घडलं नसल्याने तिने मीडियासमोरच याचा खुलासा केला.

स्वस्तिका मुखर्जी बंगाली फिल्म अभिनेत्री आहे. नुकतीच तिने 'कला' या नेटफ्लिक्सवरील सिनेमात भूमिका साकारली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वस्तिका म्हणाली,'हे सगळं खूपच रँडम पद्धतीने सुरु झालं. जितके दिवस सिनेमाचे शूट आणि डबिंग केले तोपर्यंत मी संदीप सरकार यांना भेटलेच नव्हते. सहनिर्माते अजंता सिन्हा रॉय हेच आमच्याशी चर्चा करायचे. अचानक संदीप सरकार यांनी मला धमकीवजा ईमेल पाठवणं सुरु केलं. ते अमेरिकन नागरिक असल्याचा दावा त्यांनी केला. मी त्यांच्याशी सहकार्य नाही केलं, तर ते अमेरिकेत ओळखीने माझा व्हिसा रद्द करतील अशी धमकी दिली. त्यांनी मला पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांसमोर घेऊन जाण्याची धमकी दिली.'

स्वस्तिका पुढे म्हणाली,'आता मला याची कल्पना नाही की सहकार्य करणं म्हणजे नक्की काय अर्थ घ्यायचा होता. मी शूटिंग पूर्ण केले होते. मी कधी प्रमोशनमध्ये सहभागी व्हायला नकारही नाही दिला. आधी सिनेमा मार्च महिन्यात रिलीज होणार होता. प्रमोशनसाठी मी त्यांना माझ्या तारखा पाठवल्या होत्या. त्याचं काहीच उत्तर आलं नाही. मग  त्यांनी रिलीज डेट पुढे नेली आणि मला सांगितलंही नाही. मला दिग्दर्शकाकडून याची माहिती मिळाली. तरी मी नवीन रिलीजनुसार माझ्या तारखा पाठवल्या. कारण प्रमोशनचं काम तेच बघणार होते.'

'तो मला म्हणाला की तो माझे फोटो मॉर्फ करुन पॉर्नोग्राफी वेबसाईट्सवर पोस्ट करेल. ईमेलमध्येही त्याने माझे दोन मॉर्फ फोटो जोडले होते. हा तर लैंगिक अत्याचार आहे. संदीप सरकारने हे मान्यही केलं की तो त्या हॅकरचा ओळखीचा आहे.' स्वस्तिकाच नाही तर तिच्या मॅनेजरलाही धमकीवजा ईमेल मिळत होते.  त्याला रवीश शर्मा या व्यक्तीचा ईमेल आला. त्याने दावा केला की तो एक मोठा कम्प्युटर हॅकर आहे.

स्वस्तिका शेवटची 'कला' सिनेमात दिसली होती. याशिवाय तिने 2015 मध्ये आलेल्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने सुशांतसिंग राजपूतच्या 'दिल बेचारा' सिनेमातही काम केले होते. तसंच अॅमेझॉन प्राईमच्या 'पाताल लोक'मध्येही दिसली होती.

टॅग्स :सिनेमासोशल मीडियाव्हायरल फोटोज्