Join us

'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:12 AM

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' एकाच दिवशी रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिस क्लॅशविषयी निर्माते भूषण कुमार यांनी मौन सोडलंय

बॉलिवूडमध्ये यंदाची दिवाळी सध्या दोन सिनेमांनी चांगलीच गाजवली. ते सिनेमे म्हणजे 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण  बॉक्स ऑफिस रिपोर्ट बघता 'भूल भूलैय्या ३'ने कमाईच्या बाबतीत  'सिंघम अगेन'ला चांगलीच मात दिल्याचं समजतंय. अशातच 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते भूषण कुमार यांनी एका मुलाखतीत  'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' यांच्या एकत्र प्रदर्शनाविषयी मौन सोडलंय. 

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'च्या टक्करबद्दल निर्माते काय म्हणाले?

भूषण कुमार यांनी कनेक्ट सिनेला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. ते म्हणाले की, "मी अजय देवगण सर आणि रोहित शेट्टी यांना भेटलो. मी त्यांना म्हणालो की भूल भूलैय्या ३ ची घोषणा मी आधी केली होती. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मसंबंधी काही मर्यादा होत्या. त्यामुळे मी भूल भूलैय्या ३ ची रिलीज डेट पुढे ढकलू शकत नाही. त्यांनी माझं म्हणणं समजून घेतलं. परंतु त्यांच्याही काही मर्यादा होत्या. कारण त्यांच्या सिनेमाचा विषय रामायणावर आधारीत होता. त्यामुळे दिवाळीमध्ये सिनेमा रिलीज करणं त्यांनाही भाग होतं."

सिंघम अगेन VS भूल भूलैय्या ३

अशाप्रकारे 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे दोन्ही सिनेमे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी १ नोव्हेंबरला रिलीज झाले.  'सिंघम अगेन' बिग बजेट सिनेमा होता. तरीही बॉक्स ऑफिसवर सिनेमांच्या कमाईकडे एक नजर टाकल्यास तु्म्हाला कळेल की, बजेटच्या तुलनेत 'सिंघम अगेन'ची कमाई संथ गतीने सुरु आहे. तर दुसरीकडे भूल भूलैय्या २ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर लोकांंचं लक्ष वेधून घेतोय.

टॅग्स :भुषण कुमारकार्तिक आर्यनरोहित शेट्टीअजय देवगण